साप पाहताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. काही साप इतके विषारी असतात की (snakes) एकदा दंश केला तरी आपला मृत्यू होऊ शकतो. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अडचणीच्या ठिकाणी साप लपलेले असतात. अनेकदा झाडांच्या गर्दीत किंवा झाडावरही साप आढळतात. अशी काही झाडे आहेत जी सापाला नेहमी आकर्षित करतात. जर तुमच्या बागेत ही झाडे असतील तर तुमच्या घराच्या आसपास साप दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास खालील झाडे असतील तर ती लगेच उखडून टाका. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केळीची झाले ही सापांच्या आवडीची झाडे असतात. केळीची झाडे (snakes) एकमेकांच्या जवळ वाढतात, ज्यामुळे सापांना ओलसर जागा आणि सावली सहज उपलब्ध होतात, तसेच केळीच्या झाडांच्या खोडात साप लपू शकतात. त्यामुळे या झाडाच्या आसपास साप तुम्हाला दिसू शकतात. त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास जर केळीचे झाड असेल तर ते आत्ताच उखडून टाका. यामुळे साप तुमच्या घराच्या जवळ येणार नाही.

वडाच्या झाडाकडेही साप आकर्षित होतात. कारण वडाचे (snakes) झाड खूप मोठे असते. झाडाची जाड मुळे आणि गुंतागुंतीच्या फांद्या सापांना चढण्यासाठी आणि लपण्यासाठी सुरक्षित असतात. त्यामळे अनेकदा या झाडावर तुम्हाला साप आढळू शकतात.बांबूची झाले ही समुहाने वाढतात. बांबुच्या बेटात विविध कीटक आणि सापांना लपून बसण्यासाठी जागा असते. तसेच बांबूच्या झाडाखालील माती ओलसर असते. त्यामुळे साप या ठिकाणी विश्रांती करणे पसंत करतात. त्यामुळे बांबूभोवती साप दिसू शकतात.

लेमनग्रास ही दाट, लांब पानांची वनस्पती आहे. या पानांमध्ये (snakes) साप लपून बसतात. लेमनग्रास कुठेही सहज वाढते, त्यामुळे अनेकदा यात साप लपलेला असू शकतो. त्यामुळे हे झाड घराच्या आसपास असेल तर तुम्ही ते लगेच काढून टाका.कण्हेरीची झाडेदेखील सापांना आकर्षित करतात. या झाडाच्या जाड पानांमध्ये आणि वनस्पतींमधील मोकळ्या जागेत साप लपून बसतात. उंदीर, कीटक आणि इतर लहान प्राणी बहुतेकदा कण्हेरीच्या झाडांभोवती आढळतात, ज्यामुळे सापांना अन्न देखील सहज मिळते.
चंपा आणि अपराजिता वनस्पती देखील सापांना आकर्षित करतात. या झाडांच्या फुलांचा वास त्यांना आकर्षित करतो. या वनस्पतींमध्ये साप नेहमी लपतात.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं