कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

‌नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपल्यानंतर विविध (rolled)राजकीय पक्षातील निष्ठावंतांचा आक्रोश राज्यातील अनेक महानगरात ऐकायला मिळाला. उमेदवारी नाकारल्याने अनेकांना आपले अश्रू लपवता आले नाहीत. विशेष म्हणजे पक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी बहाल केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पक्षातील खासदार आणि आमदार यांच्या घरात उमेदवारी दिली जाणार नाही असे जाहीर केले होते मात्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्यातच घरात मुंबईमहापालिकेच्या निवडणुकीत तिघा जणांना उमेदवारी दिली गेली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जिल्ह्यात आणि अनेक महानगरात इनकमिंग जोरात झाले होते.या सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचे गाजर दाखवण्यात आले होते.

महापालिका निवडणुकीत सर्वच नवागतांना उमेदवारी देणे शक्य(rolled) नव्हते मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून नवागतांच्यासाठी भाजपने अनेक ठिकाणी पायघड्या घातल्याचे वास्तव समोर आले आहे.पुणे महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे डिजिटल फलक काढून टाकले. अकोला महापालिकेच्या निवडणुकीतउमेदवारी मिळण्याचा नैतिक हक्क असताना एका महिला उमेदवाराला भाजपने तिकीट नाकारल्यानंतर तिने रस्त्यावरच भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर अक्षरशः आक्रोश केला. च्या बरोबरच्या इतर महिला रडत होत्या. नागपूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला अजित दादा पवार यांनी तिकीट नाकारल्यानंतर संबंधिताने राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन तेथील दूरदर्शन संच फोडून टाकला आणि आपला राग व्यक्त केला.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेसने एकाच घरातील दोन व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.पुणे महापालिका निवडणुकीत दीपक मानकर यांनी यांनी आपल्या दोन्ही मुलांना दोन वेगवेगळ्या पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात आणले आहे. स्थानिकांचा हक्क डावलून
मानकर यांनी संधी साधू भूमिका घेतली आहे. त्यांचा एक मुलगा भाजपकडून आणि दुसरा मुलगा राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवतो आहे.जळगाव शहरात सुद्धा निष्ठावंतांना डावल्यामुळे पक्षीय प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तेथील भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या काही (rolled)इच्छुक महिलांनी आक्रोश केला. अमरावती येथे एबी फॉर्म उमेदवारांना देताना प्रचंड धक्काबुक्की झाली. एबी फॉर्म भरण्याचा प्रयत्न झाला. नागपूर येथेही कार्यकर्त्यांच्या मध्ये असाच प्रकार घडला.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण यांचे चिरंजीव प्रसाद यांना तिकीट नाकारून अजय इंगवले यांना तिकीट दिले गेल्यानंतर प्रसाद यांनी बंडखोरी केली आहे.

त्यांनी विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोल्हापुरात भारतीय जनता पक्षाच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली गेली आहे. कोल्हापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाने मूळ कार्यकर्त्यांना डावलून नवीन लोकांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरापैकी किमान 15 महानगरामध्ये बंडखोरी होणार आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर संबंधितांनी आपले अर्ज मंगळवारी अखेरच्या दिवशी भरले आहेत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी म्हणून नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर इनकमिंग केले. थोडाफोडीचे राजकारण केले. आणि आता सर्वच कार्यकर्त्यांचे समाधान करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर या नेत्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.


कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त उमेदवारी देता यावी म्हणून काही(rolled) महानगरांमध्ये महायुतीमध्ये फूट पडली आहे. महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगवेगळे लढताना दिसत आहेत. तथापि एकूणच नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या मंगळवारच्या अखेरच्या दिवशी दुपारी निष्ठावंतांचा आक्रोश दिसून आला. अनेक ठिकाणी कार्यकर्ते एकमेकाला भिडले.3 जानेवारी पर्यंत नेत्यांना काही चुका दुरुस्त करता येऊ शकतात किंवा त्यांच्याकडून फायनल उमेदवारी जाहीर होणार आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये एका महिलेला तिकीट नाकारल्यानंतर तिने पेट्रोलची बाटली हातात घेऊन पेटवून घेणार असल्याचे ओरडून सांगून पोलिसांची दमछाक केली होती.

हेही वाचा :

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,

महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य