संपूर्ण जगभरात साजऱ्या होत असलेल्या व्हॅलेन्टाईन डेच्या पार्श्वभूमीवर (shocking incident) उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सेक्टर 107 परिसरात रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारमध्ये एका तरुण-तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कारच्या पुढील सीटवर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत सापडले असून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ही घटना दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास (shocking incident) उघडकीस आली. कार बराच वेळ एका ठिकाणी उभी असल्याचे पाहून स्थानिकांना संशय आला. काही नागरिकांनी कारजवळ जाऊन पाहणी केली असता समोरचे दृश्य पाहून ते हादरले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सेक्टर 39 पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा दरवाजा उघडून दोघांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार मृत तरुण सुमित हा (shocking incident) दिल्लीतील त्रिलोकपुरी भागातील रहिवासी असून तरुणी रेखा ही नोएडातील सेक्टर 58 येथे राहत होती. दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमसंबंधातून उद्भवले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलीस अधिकारी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे प्रेमप्रकरण (shocking incident) असल्याचे दिसत असले तरी आत्महत्या की हत्या याबाबत स्पष्टता आलेली नाही. दोघांनी एकमेकांवर गोळी झाडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग होता का याचाही तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून कार आणि परिसरातून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. कारमधून एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिली असून त्यांच्या जबाबांची नोंद घेतली जात आहे. या घटनेमुळे व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच शहरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
हेही वाचा :
घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?
या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार