धावपळीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण रात्री उशिरा जेवतात. (developing) आता रात्री उशीराचं जेवणं हे सामान्य झालंय. आजकाल लोकांना रात्री उशिरा जेवताना मोबाईल फोन किंवा टीव्ही पाहण्याचीही सवय लागलीये. आणि जेवल्यानंतर लोकं लगेच झोपी जातात. मात्र तुम्हाला माहितीये का तुमच्या या सवयीमुळे पोटाचे आजार वाढवतायत.
जरी या सवयी लोकांना फार गंभीर वाटत नसल्या तरी या सवयीमुळे पचनाच्या समस्या निर्माण होतायत. रात्री उशिरा खाल्ल्याने पोटाचे आजार का वाढतात आणि ते आतड्याच्या आरोग्यासाठी कसं धोकादायक ठरतं याची माहिती तज्ज्ञांनी दिलीये.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय झालीये (developing)आणि लोकांना त्याचे परिणाम समजत नाहीत. उशिरा जेवल्याने पोटावर लगेच परिणाम दिसून येत नाहीत. पण या सवयीमुळे काही काळाने पोटाचे आजार वाढू शकतात.शरीर सर्कॅडियन रिदम नावाच्या बायोलॉजिकल क्लॉकवर चालतं. आपली पचनसंस्था ही दिवसा जास्त एक्टिव्ह असल्याचं मानलं जातं. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्न पचवण्याची त्याची क्षमता जास्त असते. रात्र होताच शरीर विश्रांती घेतं. जर तुम्ही रात्री उशिरा जेवलात तर पचनक्रिया पुन्हा कामाला लागते. यामुळे शरीराचं नॅचुरल रिदम बिघडतं.
चयापचय क्रिया मंदावते
रात्रीच्या वेळी शरीराचा चयापचय दर मंदावतो. याचाच अर्थ अन्न पचवण्याची आणि त्याचं उर्जेमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया मंदावते. ज्यावेळी लोकं रात्री उशिरा जेवतात त्यावेळी अन्न व्यवस्थित पचत नाही. यामुळे त्यातील बहुतेक भाग चरबीमध्ये रूपांतरित होतो. परिणामी शरीरात चरबीचा साठा वाढतो. यामुळे तुमचं वजन वाढण्याचाही धोका असतो.
एसिडीटीचा त्रास
रात्री उशिरा जेवल्याने पोटात गॅस्ट्रिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. जर जेवणानंतर लगेच झोपलात छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. जर हे दररोज चालू राहिलं तर अन्ननलिकेच्या आतील थराला सूज येण्याचा धोका असतो.
आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियावर होतो परिणाम
आतड्यांमध्ये चांगल्या आणि वाईट बॅक्टेरिया असतात. ज्याला आतड्यातील मायक्रोबायोटा म्हणतात. ज्यावेळी लोकं रात्री उशिरा चिप्स, बिस्किटं, आईस्क्रीम आणि कार्बोहायड्रेट्स आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात तेव्हा ते आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांना हानी पोहोचते. यामुळे गॅस आणि पोटफुगी, पोटदुखी किंवा जुलाब यांसारख्या समस्या उद्भवतात.

झोपेवर परिणाम
रात्री उशिरा जेवल्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो. (developing)याचा तुमच्या पोटावरही विपरीत परिणाम होत असतो. ज्यावेळी तुमचं पोट भरलेलं असतं आणि एसिड तयार होत असतं तेव्हा झोप येणं कठीण होऊ शकतं. एसिड आणि गॅस जमा झाल्यामुळे लोक रात्रभर अस्वस्थता जाणवते. ज्यामुळे त्यांना सकाळी थकवा जाणवतो. परिणामी हार्मोनल संतुलन बिघडून पचनक्रिया आणखी बिघडू शकते.
हेही वाचा :
Sangli : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा
खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड
जेवताना रिल्स बघणं पडेल महागात, आत्ताच सोडा ही सवय