भारतीय स्वयंपाकघरात कांदा हा केवळ चव वाढवणारा घटक नाही, तर अनेक (cuisine) घरांमध्ये तो रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग मानला जातो. भाजी, आमटी, सलाड किंवा फोडणी – प्रत्येक पदार्थात कांद्याची उपस्थिती असते. त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरासाठी उपयुक्त ठरतात, त्यामुळे कांदा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. मात्र, आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सर्वांसाठीच कांदा सुरक्षित असेल असे नाही.

विशेषतः ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास आहे, अशांनी (cuisine) कच्चा कांदा खाणे टाळणे अधिक योग्य ठरते. कांद्यामध्ये असलेले काही प्रकारचे कार्बोहायड्रेट्स पचायला जड जातात. त्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे, पोटदुखी किंवा अस्वस्थता वाढू शकते. तसेच ज्यांना वारंवार अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होते, त्यांनीही कांद्याचे सेवन मर्यादित ठेवावे. कच्चा कांदा पोटातील आम्लाचे प्रमाण वाढवू शकतो, ज्यामुळे छातीत तीव्र जळजळ जाणवू शकते.
कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे (cuisine) गुणधर्म आढळतात. त्यामुळे ज्यांची लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किमान दोन आठवडे आधी कांद्याचे सेवन थांबवणे आवश्यक असते. अन्यथा शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा नंतर रक्तस्त्रावाचा धोका वाढू शकतो. तसेच जे रुग्ण रक्त पातळ करण्याची औषधे घेत आहेत, त्यांनी कांद्याचे अतिसेवन टाळावे. कांद्यामुळे औषधांच्या परिणामात बदल होऊन जखम झाल्यास रक्त गोठण्यास अधिक वेळ लागू शकतो.
काही लोकांना कांद्याच्या वासामुळे किंवा सेवनामुळे अॅलर्जीची लक्षणेही (cuisine) दिसू शकतात. त्वचेवर खाज येणे, पुरळ उठणे, डोळे लाल होणे किंवा पाणी येणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कांदा आरोग्यासाठी उपयुक्त असला तरी, प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे सेवन करणेच अधिक सुरक्षित ठरते.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?