हवामानात सतत होणाऱ्या बदलांचा सर्वात जास्त परिणाम आपल्या आरोग्यासोबत (health) त्वचेवरही दिसून येतो. कधी कडाक्याची थंडी, कधी वाढलेले तापमान तर कधी कोरडे वातावरण – या सगळ्यामुळे त्वचा निस्तेज, कोरडी आणि थकलेली दिसू लागते. अशा वेळी महागड्या स्किनकेअर उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले दही त्वचेसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते.

दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील (health) मृत पेशी दूर करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसू लागते. दह्याचा नियमित वापर केल्यास टॅनिंग कमी होण्यास मदत होते आणि त्वचेचा नैसर्गिक रंग खुलतो. विशेष म्हणजे दही हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणूनही काम करते. कोरडी आणि रापलेली त्वचा असणाऱ्यांसाठी दह्याचा वापर खूप फायदेशीर ठरतो.
दह्यासोबत बेसन मिसळून तयार केलेला (health) फेसपॅक त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यात मदत करतो. हा पॅक चेहऱ्यावर लावून काही मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचा स्वच्छ होते आणि छिद्रे मोकळी होतात. तसेच दही आणि मध एकत्र करून लावल्यास त्वचेला पोषण मिळते. मधामध्ये असलेले नैसर्गिक गुण त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवतात आणि त्वचा अधिक मऊ बनवतात.
उन्हाळ्यात मुरुमांचा त्रास वाढत असताना (health) दह्याचा फेसपॅक उपयोगी ठरू शकतो. दह्यामध्ये असलेली पोषक तत्त्वे त्वचेला शांत करतात आणि डाग कमी होण्यास मदत करतात. त्याचबरोबर दह्यातील प्रथिने आणि कॅल्शियम कोलेजन निर्मितीस चालना देतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि त्वचा अधिक तरुण दिसू लागते.बदलत्या हवामानात त्वचेची काळजी घेण्यासाठी दह्याचा साधा आणि नैसर्गिक उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतो. नियमित आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार राहू शकते.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत