कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

समाज माध्यमिक कंपन्यांसाठी अश्लील,लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची (apps) संबंधित तसेच इतर संवेदनशील मजकूर तात्काळ ब्लॉक करण्याचे आदेश केंद्र शासनाच्या प्रसारण मंत्रालयाने काढले आहेत. या आदेशाचे स्वागत केले पाहिजे तथापि ब्ल्यू फिल्म अर्थात नील चित्रफिती प्रसारण करणारे अनेक ॲप सध्या मोबाईलवर धुमाकूळ घालत आहे. या ॲप्स ना केंद्र शासनाने बंदी घातली होती आणि त्याला काही वर्षांचा कालावधी गेला आहे. पण तरीही हे ॲप अगदी सहजरीत्या मोबाईलवर उपलब्ध होतात. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची नितांत गरज आहे.माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये अश्लील व्हिडिओ, अश्लील माहितीप्रसारित करता येत नाही. पण तरीही या कायद्याचे राजरोस उल्लंघन होताना दिसते आहे.अश्लीलतेसाठी कु प्रसिद्ध असलेल्या या ॲप कडून”तुम्ही अठरा वर्षांच्यावरील व्यक्ती आहात का?”असा प्रश्न विचारतात. संबंधित व्यक्ती आपण सज्ञान आहोत, आपले वय 18 च्या पुढे आहे

असे सुचित करतात. प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती लहान मुलगा आहे,(apps) बालिका आहे, असे समजण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. त्यामुळे या अश्लील ॲपवर कुणालाही घाणेरडे व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध होतात. अशा ॲपवर बंदी घालण्यात येऊनही ती चालू आहेत. या ॲप कंपन्यावर गुन्हे दाखल केले गेले आहेत असे ऐकिवात नाही. अशा प्रकारच्या अश्लील ॲपमुळे
बलात्कार, लैंगिक शोषण,अशा प्रकारचे गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्याला अशा प्रकारचे अश्लील प्रसारण कारणीभूत आहे.फेसबुक, इंस्टाग्राम वर मित्र हवा, जोडीदार हवा,नीड ओल्ड मॅन, असे मथळे देऊन महिलांचे नग्न, अर्ध नग्न, मादक, कामुक पोज मधले भडक फोटो व्हायरल केले जातात. प्रत्यक्षात ज्यांच्या नावाने ते फोटो असतात ते त्या मूळ महिलेचेच असतात असे नसते. तंत्रज्ञान वापरून फेक फोटो प्रसारित केले जातात.

अशा आवाहनाला आंबट शौकीन मंडळी लाईक करत असतात, कमेंट्स देत (apps) असतात, मोबाईल क्रमांक देत असतात, आणि त्यातूनच लैंगिक विषयक गुन्हे घडत असतात. डिजिटल ऍरेस्ट, ब्लॅकमेलिंग, इमोशनल ब्लॅकमेलिंग काही महिलांच्या कडून किंवा अशा व्यवसायात टोळ्यांकडून केले जाते. त्यातून सायबर क्राईम घडतो. अनेक चांगली कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत.अश्लील कंटेंट लोकांनाका आकर्षित करतो याची काही कारणे आहेत. अशा कंटेंट पासून लोकांना अलिप्त करावयाचे झाले तर, नैतिक मूल्य याविषयी प्रबोधन झाले पाहिजे आणि ते वाढले पाहिजे. हल्ली लहान मुलांना सर्रासपणे मोबाईल दिला जातो. अभ्यास करणार असशील तर, दंगा करणार नसशील तर थोडा वेळ फोन देते असे सांगून लहान मुलांना मोबाईल दिला जातो. अशाच एका लहान मुलाने कुठल्यातरी ॲप वर किंवा आलेल्या माहितीवर क्लिक केले आणि सहा लाख रुपये गुन्हेगारांच्या खात्यावर जमा झाले अशी घटना कोल्हापुरातच घडली होती.

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अश्लील कंटेंट ब्लॉक करण्यासंबंधी सूचना जारी केली आहे. आयटी कायद्याच्या कलम 79 अंतर्गत समाज माध्यम मध्यस्थ आणि इतर प्लॅटफॉर्मला कायदेशीर रित्या जबाबदार धरण्यात येणार आहे. टाकलेल्या मजकुराबाबत जबाबदारीपासून सूट हवी असेल तर त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अश्लील व्हिडिओज, लहान मुलांसाठी हानिकारक किंवा बेकायदा मजकूर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दाखवू नये किंवा तो प्रसारितही करू नये यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्र शासनाने टाकलेले हे पाऊल आश्वासक आहे, समाज हिताचे आहे, तथापि आदेशाचे पालन तंतोतंत केले जाते आहे का? हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. नुसते आदेश काढायचे नंतर काहीच करायचे नाही असे जर होणार असेल तर मग अश्लीलता थांबणार नाही. कारण अश्लील व्हिडिओ प्रसारण करणाऱ्या ॲप आजही मोबाईलवर सक्रिय आहेत.देश विघातक, समाजविघात व्हिडिओ व्हायरल केले तर संबंधिताला तातडीने ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. असे अनेक किंवा असंख्य गुन्हे यापूर्वी दाखल झालेले आहेत आणि आजही होताना दिसत आहेत. अशा व्हिडिओ बद्दल पोलीस प्रशासन जागरूक असते, पण पोलिसांनी अश्लीलतेचा बाजार मांडणाऱ्या अँप कंपनीच्या संचालकांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात धाडले पाहिजे. तरच मोबाईल मधून अश्लीलता हद्दपार होऊ शकते.

गेल्या काही वर्षांपासून वेब सिरीज चा सिलसिला वाढला आहे.(apps) अनेक भागात दाखवणाऱ्या या वेब सिरीज मध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लीलता दाखवली जाते. अशा वेब सिरीज सुद्धा कारवाईच्या वरवंट्याखाली आणल्या गेल्या पाहिजेत.ऑनलाइन गेम हा प्रकार तर तातडीने प्रतिबंधित केला पाहिजे. ऑनलाइन गेम जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटी नाही कारवाईचा दणका दिला पाहिजे. सध्या जंगली रमी या जुगाराच्या माध्यमातून शेकडो कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. पण तरीही हे प्रकार मोबाईलवर बिनधास्तपणे सुरू आहेत.हे कुठेतरी थांबवले पाहिजे.

हेही वाचा :

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,

महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य