कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

अपघात ग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स मिळाली आहे. अपघात नेमका कसा झाला?(suspicion) तो मानवनिर्मित आहे की, त्याला अन्य घटक जबाबदार आहेत या प्रश्नांची उत्तरे नजीकच्या काळात सर्वसामान्य जनतेला मिळणार आहेत, पण तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर काही राजकारण्यांनी संशय कल्लोळ उडवला आहे.अजितदादा जिवंत आहेत इथपासून ते हा अपघात नसून घातपात आहे इथपर्यंत दावा केला जातो आहे. अशा प्रकारचा अपघात होऊन त्यामध्ये महनीय व्यक्ती मृत झाल्या की,घातपाताची शक्यता लगेच बोलून दाखवली जाते. पण घातपाताचा संशय पवार कुटुंबीयातील एकाही व्यक्तीने बोलून दाखवलेला नाही.याचा अर्थ हा केवळ आणि केवळ अपघात आहे.दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी बारामती विमानतळाची धावपट्टी वैमानिकाला दिसली नाही.विमानतळ परिसरात धुके होते. परिणामी हे विमान धावपट्टी नजीकच्या खड्ड्याला धडकून ते क्रॅश झाले. या अपघातग्रस्त विमानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे होते आणि त्यांच्यासह पाच जण या अपघातात ठार झाले.यापाचही जणांच्या शरीराचे तुकडे झाले होते. अपघात झाल्याच्या पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी हा निव्वळ अपघात आहे आणि त्यात कोणी राजकारण करू नये असे आवाहन केले होते.

तथापि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे राष्ट्रीय (suspicion)अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या अपघात विषयी संशय व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडून या विमाना अपघाताची चौकशी केली पाहिजे अशी मागणीच ममता बॅनर्जी यांनी पहिल्याच दिवशी केली. काँग्रेसचे खरगे यांच्यानंतर त्यांचे महाराष्ट्रातील नेते हर्षवर्धन संकपाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनीही संशयाचा सूर लावला.अजित दादा पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसाचा दुःखवटा जाहीर करण्यात आला होता आणि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे एक बैठक झाली.अजितदादांच्या वारसदार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अजितदादांच्या अस्थिंचे विसर्जन झाल्यानंतर अगदी काही वेळातच सुनेत्रा पवार त्यांचे दोन्ही चिरंजीव पार्थ आणि जय असे मुंबईकडे रवाना झाले. अस्तित वास्तविक कुटुंबातील एखादी व्यक्ती मरण पावली तर किमान 12 किंवा 13 दिवसांचा दुःखवटा पाळला जातो.

पण सुनेत्रा पवार यांनी सुतक असतानाच राज्याच्या पहिल्या महिला (suspicion)उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राजभावनात शपथ घेतली.इतक्या घाई गडबडीने शपथविधी घेतल्यानंतर अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनावर संशय व्यक्त केला जाऊ लागला.चांगल्या विमान वाहतूक सेवेसाठी अजिबात प्रसिद्ध नसलेल्या कंपनीचे विमान या दौऱ्यासाठी का घेतले? विमानाचा पायलट सुमित याच्यावर निलंबनाची एकदा कारवाई झाली होती. तोच पायलट या विमानासाठी कसा काय दिला? 2023 मध्ये याच कंपनीचे विमान अपघातग्रस्त झाले होते हे माहीत असूनही त्याच कंपनीचे विमान घेण्या मागचे कारण काय? असे काही प्रश्न उपस्थित करून घातपाता च्या संशयाचा धूर हवेत काढला जाऊ लागला आहे.अपघाताच्या पहिल्याच दिवशी सहा व्यक्ती मरण पावल्या असे सांगितले जाऊ लागले. साहिल मदन या नावाचा व्यक्ती वैमानिक होता असेही सांगितले गेले.नंतर मात्र या अपघातात अजितदादा यांच्यासह पाचच लोकांचा मृत्यू झाला असे सांगून त्यांची नावे घोषित करण्यात आली. चुकीच्या माहितीमुळे संशय व्यक्त केला गेला हे मात्र नक्की.

इतकी चुकीची माहिती का सांगितली गेली याचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. (suspicion)विमान अपघातग्रस्त झाली त्या गावचा सरपंचम्हणतो की निळे जॅकेट असलेली एक व्यक्ती विमानातून बाहेर पडली. अजितदादा बाहेर पडले असेच त्याला सुचवावयाचे आहे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अजितदादा जिवंत आहेत अशी अफवा पसरली. अजितदादा यांचे विश्वासू विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनीही या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला आहे. काही लॉजिकली मुद्दे उपस्थित केले आहेत. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिक येथे सर्वपक्षीय सभा आयोजित केली होती आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही या विमान अपघाताविषयी काही संशय असल्याचे बोलून दाखवले. जलसिंचन विभागाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी विजय पांढरे यांनी 1995साली युतीचे सरकार होते आणि तेव्हा कृष्णा खोरे प्रकल्प हाती घेण्यात आला होता आणि त्यामध्ये शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती मी स्वतः अजितदादा पवार यांना नंतरच्या काळात दिली होती पण त्यांनी ते आता विसरून पुढे जाऊया असे मला सांगितले होते.

त्या घोटाळ्याची फाईल अजितदादा यांच्याकडे होती.असे स्पष्टीकरण देताना (suspicion)विजय पांढरे यांनी अप्रत्यक्षपणे त्या घोटाळ्याचा या विमान अपघात असे संबंध जोडला आहे.अजितदादा पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनीही पवार कुटुंबाचे सुतक संपल्यानंतर म्हणजे दिनांक 9 फेब्रुवारी नंतर या अपघात प्रकरणी आपण भाष्य करू असे सांगून या अपघाता भोवती घातपाताचे वातावरण त्यांनी तयार केलेले आहे. एकूणच या विमान अपघाता विषयी काही जण वेगवेगळे मुद्दे मांडून संशयाचे धुके निर्माण करत आहेत. अजितदादा यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच या विषयावर बोलले पाहिजे. तरच संशय कल्लोळ थांबण्याची शक्यता आहे.

ब्लॅक बॉक्स च्या माध्यमातून या अपघाताची कारणे कळतील, बघ आताची (suspicion) चौकशी करणाऱ्या पथकाकडून नक्कीच निश्चित माहिती मिळेल. पण तोपर्यंत थांबून चालणार नाही. कारण चौकशीचे आणि ब्लॅक बॉक्स चे अहवाल इतक्या लवकर उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळेच आता सुनेत्रा पवार यांनी सर्वसामान्य जनतेसमोर व्यक्त होणे गरजेचे आहे. यापूर्वी संजय गांधी, लोकसभेचे सभापती बालयोगी, केंद्रीय मंत्री माधवराव सिंदिया यांचे विमान अपघातात निधन झाले आहे.देशाचे सीडीएस बिपिन रावत यांच्यासह काही लष्करी अधिकारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाले. तसेच अहमदाबाद विमान दुर्घटना अशा अनेक घटना घडल्या. आणि या प्रत्येक दुर्घटनेवेळी अशाच प्रकारचा घातपाताचा संशय व्यक्त केला गेला होता.

हेही वाचा :

मोठी बातमी! जग भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर, अमेरिकेचा मोठा निर्णय, ट्रम्प यांचा थेट आदेश.., भारतावरही मोठं संकट

सकाळी तुम्ही या गोष्टी पाहिल्या तर दिवस जातो खराब, कशी घ्यावी काळजी?

प्रेमात दगाफटका, तृतीयपंथीयाने विचारला जाब, अखेर तरुणाने केले भयानक कांड