जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय परिसरातील जंगलात तृतीयपंथीयाची (transgender) जाळून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाचे केवळ हात आणि पाय शिल्लक असल्याने ओळख पटविणे मोठे आव्हान ठरले होते. मात्र अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक करत या हत्येचा पर्दाफाश केला आहे.

दोन दिवसांपूर्वी पद्मालयच्या जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह (transgender) आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासानंतर मृत व्यक्ती तृतीयपंथीय असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे समोर आले असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
मृत तृतीयपंथीयाचे नाव आकांक्षा उर्फ अजय गेंद्रे (वय २६) असे असून तिचे स्वप्नील पाटील (वय २१) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले होते. त्यानंतर जंगलात गेल्यावर स्वप्नीलने आकांक्षाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर पेट्रोलच्या सहाय्याने तिला जाळून निर्घृणपणे हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्वप्नील प्रेमसंबंध (transgender) तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आकांक्षाला आला होता. यामुळे आकांक्षाने स्वप्नीलची गावात तसेच विविध ठिकाणी बदनामी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या बदनामीचा आणि आकांक्षाकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा राग मनात धरून स्वप्नीलने ही हत्या नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात आरोपी स्वप्नील पाटील याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अत्यंत क्रूर आणि संवेदनशील असलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले असून तृतीयपंथीयांवरील वाढत्या हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा :

फक्त 1 रुपयासाठी या अभिनेत्याने नाकारलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट

पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई

प्रसिद्धीसाठी काय पण! हॉटेलमध्ये वेटरने मुलीसमोर अशी दाखवली क्रिएटिविटी पाहून तुम्हाला येईल संताप, Video प्रचंड व्हायरल