सध्या सोशल मीडियावर वेगळं आणि युनिक दिसण्यासाठी मोठीच स्पर्धा सुरू आहे.(creativity) विशेषतः फूड इंडस्ट्रीमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. मात्र, एका रेस्टॉरंटने क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली थेट सर्व मर्यादा ओलांडल्याचं चित्र समोर आलं आहे. येथे जेवण वाढण्यासाठी चक्क फावड्याचा वापर करण्यात आला आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ X पूर्वीचे ट्विटर वर या हँडलवरून शेअर करण्यात आला असून, तो पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक वेटर आत्मविश्वासाने ग्राहकांच्या टेबलकडे जाताना दिसतो. मात्र, त्याच्या हातात नेहमीप्रमाणे प्लेट किंवा ट्रे नसून, थेट लोखंडी फावडा असल्याचं पाहून अनेकांना धक्का बसतो.

या फावड्यात बिर्याणी आणि इतर नॉनव्हेज पदार्थ भरलेले दिसतात. (creativity)टेबलवर आधीच ठेवलेल्या केळीच्या पानावर तो वेटर फावड्याने जेवण ओततो. त्या पदार्थांमध्ये मासे, अंडी आणि चिकनचे तुकडे स्पष्टपणे दिसत असून संपूर्ण प्रकार बिर्याणी सर्व्ह करण्याचा असल्याचं लक्षात येतं.रेस्टॉरंटने हा प्रकार क्रिएटिव्ह म्हणून सादर केला असला तरी सोशल मीडियावर यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा प्रकार म्हणजे खाण्याचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे, खूपच घाणेरडी सर्व्हिस. व्हायरल होण्यासाठी अन्नाचा अपमान केला जात आहे.

दुसऱ्या युजरने संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं, भारतीय संस्कृतीत अन्नाला देव मानलं जातं. (creativity)अन्न सन्मानाने वाढणं ही आपली परंपरा आहे. आधुनिकतेच्या नावाखाली या संस्कृतीची थट्टा केली जात आहे. तर आणखी एका युजरने उपरोधिक टोला लगावत म्हटलं, उद्या हे लोक जेसीबीने जेवण वाढायला लागले तरी मला आश्चर्य वाटणार नाही.या घटनेनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून, क्रिएटिव्हिटी आणि अतिरेक यामधील सीमारेषा ओळखणं किती गरजेचं आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. व्हायरल होण्यासाठी काहीही करणं योग्य आहे का, की अन्न आणि संस्कृतीचा सन्मान राखणं अधिक महत्त्वाचं आहे असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.

हेही वाचा :

सिमेवरच्या तारांच्या कुंपणाला जवान रिकाम्या काचेच्या बाटल्या का अडकवतात? खरं कारण कळलं तर तुम्हीही हे उपाय लावाल

सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई हादरली; हायड्रोजन फुग्यांचा स्फोट, 3 जण गंभीर भाजले – धक्कादायक VIDEO समोर