१४ जूनला रेल्वेने प्रवास करताय? मग ही बातमी आधी वाचा! ‘या’ गाड्या रद्द

पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. 14 जून रोजी रेल्वे प्रशासनाकडून यार्ड परिसरात देखभाल आणि आधुनिकीकरणाची कामे हाती घेतली जाणार असल्यामुळे 9 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाचा परिणाम (Railway) अनेक एक्स्प्रेस, डेमू आणि लोकल गाड्यांवर होणार असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक लागू राहणार आहे. या दरम्यान यार्डमधील पॉईंट बदलणे, सिग्नल यंत्रणेमध्ये सुधारणा करणे तसेच ओव्हरहेड विद्युत उपकरणांची दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे केली जाणार आहेत. (Railway) त्यामुळे काही प्लॅटफॉर्म रेल्वे वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागणार आहेत.या ब्लॉकचा फटका अनेक महत्त्वाच्या रेल्वे सेवांना बसणार आहे. पुणे-नागपूर एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-दौंड डेमू, बारामती-पुणे डेमू, सातारा-पुणे डेमू, पुणे-तळेगाव लोकल तसेच सीएसएमटी मुंबई -पुणे आणि पुणे-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस या प्रमुख गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवरील प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागू शकते.

रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही गाड्यांच्या टर्मिनल आणि मार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नियमितपणे पुणे स्थानकावर येणाऱ्या किंवा येथून सुटणाऱ्या काही गाड्या आता शिवाजीनगर , खडकी किंवा हडपसर स्थानकांवरून चालवल्या जाणार आहेत. तसेच लोणावळा -तळेगाव -पुणे या उपनगरीय मार्गावरील अनेक लोकल सेवा केवळ शिवाजीनगरपर्यंतच मर्यादित राहतील.याशिवाय काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रारंभिक स्थानकातही बदल करण्यात आला आहे. पुणे-जयपूर एक्स्प्रेस आणि पुणे-मुंबई मार्गावरील काही गाड्या खडकी स्थानकावरून सुटतील. तर पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस 14 जून रोजी पुणे ऐवजी सातारा स्थानकावरून प्रवास सुरू करणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबई-बेंगळुरू आणि ग्वाल्हेर-दौंड मार्गावरील काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता व्यक्त केली आहे.तसेच पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस ही नियमित वेळेपेक्षा सुमारे चार तास उशिराने, (Railway) म्हणजे सायंकाळी 7:55 वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी भारतीय रेल्वे च्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर किंवा एनटीईएस ॲपवर गाड्यांची सद्यस्थिती तपासूनच प्रवासाला निघावे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?

तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू

सोनसाखळी चोरणारे चौघे जेरबंद