आधार कार्ड हे आजच्या घडीला प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. शालेय प्रवेश, बँक खाते उघडणे, सिम कार्ड खरेदी, शासकीय योजनांचा लाभ घेणे अशा अनेक कामांसाठी आधार कार्डाची आवश्यकता भासते. (Aadhaar card) त्यामुळे आधार कार्डावरील माहिती अचूक असणे तितकेच गरजेचे आहे. विशेषतः आधारशी जोडलेला मोबाईल नंबर योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण बहुतांश ऑनलाइन सेवांसाठी ओटीपी (OTP) याच क्रमांकावर पाठवला जातो.

अनेक वेळा आधार कार्डाशी जुना किंवा चुकीचा मोबाईल नंबर जोडलेला असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत ओटीपी मिळत नाही किंवा चुकीच्या व्यक्तीकडे जातो. अनेक वेळा आधार कार्डाशी जुना किंवा चुकीचा मोबाईल नंबर जोडलेला असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. (Aadhaar card) अशा परिस्थितीत ओटीपी मिळत नाही किंवा चुकीच्या व्यक्तीकडे जातो, ज्यामुळे वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर वेळेवर अपडेट करणे आवश्यक आहे.
आधार कार्डावरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी नागरिकांना जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागते. UIDAI च्या नियमानुसार ही प्रक्रिया सध्या ऑनलाइन उपलब्ध नाही. केंद्रावर जाऊन आधार अपडेट फॉर्म भरावा लागतो. या फॉर्ममध्ये नवीन मोबाईल नंबर आणि आवश्यक असल्यास ई-मेल आयडीची माहिती अचूकपणे नमूद करावी लागते. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राची आवश्यकता नसते.ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. अर्ज स्वीकारल्यानंतर आधार डेटाबेसमध्ये बदल नोंदवला जातो आणि साधारणपणे ९० दिवसांच्या आत मोबाईल नंबर अपडेट झाल्याचा संदेश संबंधित क्रमांकावर पाठवला जातो. (Aadhaar card) त्यामुळे आधारशी जोडलेला मोबाईल नंबर चुकीचा असल्यास नागरिकांनी विलंब न करता तो अपडेट करून घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा :
सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?