बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (superstar) दर रविवारी आपल्या जुहूतील बंगल्याबाहेर चाहत्यांना दर्शन देतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास वाट पाहतात आणि बिग बी देखील तितक्याच आपुलकीने चाहत्यांची भेट घेताना दिसतात. मात्र, अलीकडे त्यांच्या बंगल्याबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामागचं कारण थोडंसं गोंधळात टाकणारं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन (superstar) यांच्या हातात एक पोस्टर दिसत आहे. या पोस्टरवर लिहिलेला मजकूर वाचून अनेक नेटकरी चक्रावले. पोस्टरवर, ‘मला साथ द्या.. माझ्या सासरकडचे माझ्या पत्नीला पाठवत नाहीयेत. 1992 अ लव्ह मॅरेज.’ असे शब्द होते. हा मजकूर पाहताच चाहत्यांपासून पापाराझींपर्यंत सगळ्यांनाच नेमकं प्रकरण काय, असा प्रश्न पडला.
मात्र या पोस्टरमागचं सत्य वेगळंच निघालं. या पोस्टरचा अमिताभ बच्चन (superstar) यांच्याशी कोणताही वैयक्तिक संबंध नसून, तो एका आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता. हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. बिग बींनी केवळ काही क्षणांसाठी हा पोस्टर हातात धरला आणि नंतर तो संबंधित टीमकडे परत दिला. पण तोपर्यंत या क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
व्हिडीओ व्हायरल (superstar) होताच कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टरचा संबंध थेट जया बच्चन यांच्याशी जोडत मिश्कील प्रतिक्रिया दिल्या. ‘अशी पत्नी असेल तर सासरीच ठीक आहे’ अशी गंमतीशीर कमेंट कुणी केली, तर ‘लांब राहणंच कधी कधी चांगलं’ असं दुसऱ्याने लिहिलं. जया बच्चन त्यांच्या स्पष्ट आणि तापट स्वभावासाठी ओळखल्या जात असल्याने, पापाराझींसोबतच्या त्यांच्या अनेक व्हिडीओंची आठवण काढत नेटकऱ्यांनी या व्हायरल क्लिपवर मजेशीर फिरकी घेतली आहे.
एकूणच, साध्या प्रमोशनल पोस्टरमुळे निर्माण झालेला हा गैरसमज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, बिग बींच्या एका छोट्याशा कृतीनेही किती मोठी चर्चा होऊ शकते, याचंच हे उदाहरण ठरत आहे.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी