लोक आयुष्याची प्रत्येक सकाळ वेगवेगळ्या सवयींनी सुरू करतात. कुणी योग-व्यायामाने (yoga) तर कुणी चहा-नाश्त्याने दिवसाची सुरुवात करतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर केलेल्या काही छोट्या चुका दिवसभराच्या मानसिक स्थितीवर आणि आयुष्यावर परिणाम करू शकतात, असे मानले जाते. त्यामुळे सकाळची सुरुवात कशी करावी आणि काय टाळावे, याबाबत वास्तुशास्त्रात काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

वास्तुशास्त्रानुसार घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून (yoga) ते एक ऊर्जाकेंद्र असते. घरातील रचना, स्वच्छता आणि दिशांचा थेट परिणाम माणसाच्या विचारांवर, आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर होतो. घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते, असे सांगितले जाते. घरात अनावश्यक, मोडक्या किंवा तुटलेल्या वस्तू साठवून ठेवू नयेत, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहील याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते.

सकाळी उठल्यानंतर काही गोष्टी पाहणे टाळावे, असे वास्तुशास्त्रात नमूद केले (yoga) आहे. त्यामध्ये आरसा पाहणे ही एक सवय अनेकांकडे असते. मात्र सकाळी शरीरात नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण जास्त असते आणि अशावेळी आरशात पाहिल्यास ती ऊर्जा परत आपल्यात शोषली जाऊ शकते, असे मानले जाते. यामुळे दिवसभर चिडचिड, सुस्ती किंवा आळशीपणा जाणवू शकतो. त्यामुळे आधी चेहरा धुवून मग आरशाकडे पाहावे, अशी शिफारस केली जाते.

याशिवाय कुलूपबंद घड्याळे, तुटलेल्या वस्तू किंवा (yoga) अस्ताव्यस्त सामान सकाळी उठताच नजरेस पडू नये, असेही सांगितले जाते. अशा वस्तू मानसिक तणाव वाढवतात आणि आत्मविश्वासावर परिणाम करतात, अशी धारणा आहे. तसेच अंथरुणातून उठताच घाणेरडी किंवा अव्यवस्थित जागा पाहिल्यास मनावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून सकाळी उठल्यानंतर खोली आणि अंथरुण नीटनेटके ठेवणे वास्तु आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या तळहातांकडे पाहून इष्टदेवाची आठवण करावी आणि काही वेळ नैसर्गिक प्रकाशात घालवावा. यामुळे मन प्रसन्न राहते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेसह होते, असा विश्वास आहे.

हेही वाचा :

फक्त 1 रुपयासाठी या अभिनेत्याने नाकारलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट

पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई

प्रसिद्धीसाठी काय पण! हॉटेलमध्ये वेटरने मुलीसमोर अशी दाखवली क्रिएटिविटी पाहून तुम्हाला येईल संताप, Video प्रचंड व्हायरल