कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कुविख्यात गुन्हेगार (kill) लॉरेन्स बिश्नोई याचे नाव गाजते आहे. मुंबईत किंवा देशात एखाद्या सेलिब्रेटीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला किंवा त्याच्या निवासस्थानासमोर फायरिंग झाले तर लॉरेन्स बिश्नोई याचेच नाव चर्चेत येते. स्टंट सीन साठी प्रसिद्ध असलेल्या रोहित शेट्टी याच्या निवासस्थानासमोर गोळीबार करण्यात आला आणि हा प्रकार बिश्नोई यांच्या गुंडांनी केला असल्याचे स्पष्ट झाले असून मुंबई पोलिसांनी पाच संशयितांना या प्रकरणी अटक केली आहे. हे वृत्त गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर वारंवार सांगितले जात आहे, दाखवले जात आहे. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी आणि बिश्नोई गॅंग चे नाव चर्चेत येण्यासाठी असे प्रकार केले जातात. हे गुन्हेगारी प्रकार थांबवण्यासाठी बिश्नोई गॅंगला मीडियातून हद्दपार केले पाहिजे.

त्यांना अनुल्लेखाने मारले पाहिजे.राजस्थानातील‌ जोधपूर परिसरात(kill)सलमान खान याने हरणाची केलेली शिकार आणि त्यानंतर त्याच्या मुंबईतील निवासस्थानासमोर गुन्हेगारांनी केलेला गोळीबार .या घटनेनंतर कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हे नाव मीडियामध्ये झळकू लागले. त्याआधी पंजाबचा गायक सिद्धू पुसेवाला खून प्रकरणात लॉरेन्स याचे नाव पुढे आले.
पोलीसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सध्या तो साबरमती तुरुंगात आहे.हा लॉरेन्स बिश्नुई कॅनडा आणि पोर्तुगाल या दोन ठिकाणाहून गुन्हेगारी कारवाया करायचा. जगभरात त्याचे 800 शार्प शूटर आहेत. भारतातही ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांची हत्या बिश्नोई गॅंगने‌‌ केली. यामध्ये काही संशियतांना पोलिसांनी अटक केली आहे आणि सध्या हे प्रकरण न्याय प्रलंबित आहे. सलमान खान याच्या निवासस्थानासमोर फायरिंग केल्यानंतर बिश्नोई गॅंग आणि बिश्नोई समाज याबद्दलची रंजक माहिती मीडियामध्ये येऊ लागली. त्यातून लॉरेन्स याची हिंदू डॉन म्हणून प्रसिद्धी होऊ लागली. बिश्नोई समाजात हरीण आणि काळवीट या प्राण्यांना देव समजले जाते. हा समाज धार्मिक पर्यावरणवादी आहे.

हरणाची शिकार करून सलमान खान यांने फार मोठा गुन्हा केला आहे, (kill)आणि त्याला आम्ही ठार मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी धमकी त्याला दिली गेली आहे. त्यामुळे सलमान खान याच्या निवासस्थानाच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ ग्लास बसवण्यात आले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. सलमान खान याच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून स्टंट सीनचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याला या गँगने रडार वर घेतले आहे. नुकताच त्याच्या निवासस्थानासमोर झालेला गोळीबारचा प्रकार हा त्यातलाच एक भाग समजला जातो.मीडियातून सातत्याने बिश्नोई समाज आणि लॉरेन्स याच्या टोळी विषयी माहिती येऊ लागल्यानंतर सर्वसामान्य जनतेला त्याच्याविषयी राग येण्याऐवजी, सहानुभूती मिळू लागली आहे. कारण मीडियाने त्याला हिंदू डॉन म्हणून प्रसिद्धी दिली आहे.सलमान खान याने हरणांची शिकार केली म्हणून तेव्हा प्रकरण फारच गाजले होते. त्याच्यासह काही जणांच्या वर गुन्हा दाखल करून न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बिश्नोई गॅंगने सलमानला टार्गेट केले. सलमानशी ज्यांचे संबंध आहेत त्यांनाही या गॅंगने लक्श केले आहे.

मुंबईसह देशातील प्रमुख महानगरामधील सेलिब्रेटिंमध्ये दहशत (kill) निर्माण करण्यासाठी लॉरेन्स गॅंग कडून संबंधितांच्या निवासस्थानासमोर फायरिंग करण्याचा प्रकार सुरू केला आहे. वास्तविक सलमान खान, रोहित शेट्टी यांच्याकडे खाजगी सुरक्षा व्यवस्था आहे. पण त्यांना पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा पुरवली जाते. वास्तविक लॉरेन्स गॅंग ही त्यांना मिळत असलेल्या प्रसिद्धीचा गुन्हे करण्यासाठी वापर करताना दिसते आहे. मीडियाने या गॅंगला अनुल्लेखाने मारायचे ठरवले तर या गॅंग कडून दहशतीचे प्रकार होणारच नाहीत. दहशत हे त्यांचे भांडवल आहे आणि प्रसिद्धी हा त्यांचा प्राणवायू आहे. आणि म्हणूनच मीडियाने अशा गॅंगना मीडियातूनच हद्दपार केले पाहिजे. टोळीचा नामोल्लेख न करता बातम्या दिल्या पाहिजेत. तरच अशा घटनांना पायबंद बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका