कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची, तर (Kolhapur) उपमहापौरपदी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत रूपाराणी निकम यांना 46 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सचिन मारुती शेंडे यांना 35 मते मिळाली. स्पष्ट बहुमताच्या जोरावर रूपाराणी निकम यांची महापौरपदी निवड घोषित करण्यात आली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांनी काँग्रेसचे उमेदवार दुर्वास परशुराम कदम यांचा पराभव करत 46 मते मिळवली, तर कदम यांना 35 मते मिळाली.

या निवडणुकीमागे (Kolhapur) लोकसभा निवडणुकीचा राजकीय संदर्भ महत्त्वाचा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांना शब्द दिला होता. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करताना, शिवसेनेकडून जनसुराज्य पक्षाला योग्य तो सन्मान दिला जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते. वारणानगर येथे विनय कोरे यांची भेट घेतल्यानंतर दिलेला तो शब्द आज उपमहापौर पद देऊन पाळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकमेव नगरसेवक असतानाही अक्षय जरग यांना उपमहापौरपद कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित झाला असला तरी या निर्णयामागे लोकसभा निवडणुकीची रणनीती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शब्द पाळणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, रूपाराणी निकम आणि अक्षय जरग यांच्या विजयानंतर (Kolhapur) समर्थकांनी जल्लोष साजरा केला. वाद्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चार दिवसांपूर्वीच महापौरपदासाठी रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा केली होती. दुसरीकडे, कोल्हापुरात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा महापौर व्हावा, यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बॅनरबाजी करत दबाव निर्माण केला होता. त्यामुळे महापौरपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर भाजपकडून रूपाराणी निकम यांना संधी देण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या (Kolhapur) निवडणुकीत महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले. महायुतीविरोधात काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तसेच कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी थेट लढत दिली. त्यांनी एकहाती प्रयत्न करत 34 जागा जिंकून आणल्या. मात्र, शिवसेना ठाकरे गटाला केवळ एकच जागा मिळाल्याने अवघ्या सहा जागांअभावी महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या हातून निसटली. जागावाटप पाहता काँग्रेस हा कोल्हापूरमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसकडे 34, भाजपकडे 26, शिवसेना शिंदे गटाकडे 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 4, तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडे 1 जागा आहे. शरद पवार गटाची राष्ट्रवादी कोल्हापुरात खातेही उघडू शकलेली नाही. काँग्रेसने 81 पैकी 75 जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी 34 उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे, महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे.

हेही वाचा :

फक्त 1 रुपयासाठी या अभिनेत्याने नाकारलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट

पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई

प्रसिद्धीसाठी काय पण! हॉटेलमध्ये वेटरने मुलीसमोर अशी दाखवली क्रिएटिविटी पाहून तुम्हाला येईल संताप, Video प्रचंड व्हायरल