पन्हाळा येथे पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून (suspicion) पतीने पत्नीच्या डोक्यात सिमेंट काँक्रिटच्या विटेने घाव घालून खून केल्याची घटना घडली. याबाबत पतीने खुनाची कबुली दिल्याने पन्हाळा पोलिसांनी आरोपी पती रमेश बाबूराव धडेल वय ६४, मूळ गाव केर्ले, ता. करवीर, सध्या रा. पन्हाळा याला अटक केली आहे.याबाबत पन्हाळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोल्हापुरातील व्यावसायिक किशोर हरदास चंदवाणी यांचा पन्हाळा येथे बंगला आहे. या बंगल्याची देखरेख करण्यासाठी त्यांनी वॉचमन म्हणून आरोपी रमेश धडेल याला नोकरीस ठेवले होते. घडेल सध्या नोकरीनिमित्त चंदवाणी यांच्या बंगल्यातील वॉचमन रूममध्ये राहात होता.

मंगळवारी आरोपी रमेश व त्याची मृत पत्नी कांचन रमेश धडेल (suspicion)वय ५५ , मूळ गाव केर्ले, ता. करवीर, सध्या रा. पन्हाळा यांच्यात पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून चंदवाणी यांचे बंगल्याचे टेरेसवर वाद सुरू झाला. तेव्हा चिडलेल्या रमेशने पत्नीच्या डोक्यात सिमेंट काँक्रिटच्या विटेने घाव घातले. यामध्ये कांचन हिचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी झालेल्या वादाच्या आवाजाने धडेल यांच्या नातेवाइकांनी बंगल्याच्या (suspicion)दिशेने धाव घेतली. तेव्हा रमेश हा रक्ताने माखलेल्या कपड्यांनीशी टेरेसवरून खाली येताना दिसला. तेव्हा त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रमेशला ताब्यात घेतले. त्याने टेरेसवर पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. याबाबत रमेशचे जावई शहाजी दगडू साळवी यांनी फिर्याद दिली. फिर्यादीवरून आरोपी रमेश यास पन्हाळा पोलिसांनी अटक केली.रमेश व कांचन या दांपत्याच्या मुलाचे लग्न ठरले असून, त्याचा चार दिवसांत साखर पुडा होणार होता. त्या आधीच ही घटना घडल्याने ठरलेल्या लग्नाचे काय होणार, याचीच उपस्थितांत चर्चा सुरू होती.

हेही वाचा :

सिमेवरच्या तारांच्या कुंपणाला जवान रिकाम्या काचेच्या बाटल्या का अडकवतात? खरं कारण कळलं तर तुम्हीही हे उपाय लावाल

सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई हादरली; हायड्रोजन फुग्यांचा स्फोट, 3 जण गंभीर भाजले – धक्कादायक VIDEO समोर