देशाच्या सर्वांगीण विकासात रस्ते महत्त्वाचे असतात. (stopped)देश आर्थिक महासत्ता बनला, किंवा संपन्न झाला म्हणून रस्ते चांगले आहेत असे नाही तर रस्ते चांगले आहेत म्हणून देश आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेअसे म्हटले जाते. देशांना समृद्धीकडे नेणारे रस्तेही सुरक्षित असले पाहिजे. पण या महत्त्वाच्या बाबीकडे आपल्याकडे दुर्लक्ष होते आहे. बुधवारी पुणे मुंबई महामार्गावर तब्बल वीस तास वाहतूक थांबली होती.मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दळणवळण किंवा वाहतुकीला” यातायात”म्हटले जाते. तथापी प्रवाशांना यातना सहन कराव्या लागणार असतील तर ही यातायातच नको असे म्हणण्याची वेळ प्रवाशावर येते. बुधवारी हेच घडले.मुंबई पुणे महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅस वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला. या टँकर मधून गॅस गळती सुरू झाली. प्रोपलिन नावाचा हा गॅस अत्यंत ज्वलनशील असतो.त्यामुळे महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली.त्यामुळे महामार्गावर जवळपास 25 किलोमीटरअंतरा पर्यंत वाहनाची रांग लागली होती. तासाभरात सर्व काही सुरळीत होईल. असा विचार करून प्रवासी थांबले होते.

पण वेळ वाढत चालला आणि मग प्रवासी अस्वस्थ बनले.(stopped) तब्बल 15 तासापेक्षाही अधिक काळ रस्त्यावरच थांबलेल्या विविध वाहनांमधील प्रवाशांच्या अडचणी वाढू लागल्या. महामार्गावर काहीच उपलब्ध नव्हते. लहान मुलांचे हाल झाले. त्यांची भूक भागवण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता. अनेक जण तहानलेले होते. वाहनामध्ये असलेले बाटलीबंद पाणी संपल्यानंतर आता तहान कशी भागवायची हा मोठा प्रश्न होता. पुणे ग्रामीण पोलिसांना हे समजल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या पोलिसांनी प्रवाशांना बिस्किटाचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. पोलिसांनी ही सजगता आणि माणुसकी दाखवली म्हणून प्रवाशांना किमान थोडा दिलासा मिळाला. प्रोपलीन नावाचा हा गॅस अतिशय ज्वलनशील असतो. या घटनेची माहिती समजल्यानंतर एनडीआरएफ आणि बीपीसीएलची टीम घटनास्थळी आली. पण गॅस गळती थांबवण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे टँकर मधील गॅस संपून तो हवेत मिसळून जाण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय या टीम कडे काही पर्याय नव्हता. अशा वायुगळतीमध्ये वाहतूक चालू ठेवणे अत्यंत धोकादायक होते म्हणून वाहतूकच थांबवण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता.
आता या गॅस टँकरच्या अपघाताची व गॅस गळतीची चौकशी करण्याचे (stopped)आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या चौकशीचे पुढे काय होते हे सर्व सामान्य जनतेला कधीच समजत नाही. त्यामुळे बुधवारी गॅस टँकर पलटी होऊन त्यातून गॅस गळती झाली आणि तब्बल वीस तास प्रवाशांना महामार्गावर थांबावे लागले. असे प्रकार पुन्हा कधी घडू नयेत यासाठी काही उपाय योजना चौकशी करणाऱ्यांनी राज्य शासनाला सुचवल्या पाहिजेत. टँकरच्या माध्यमातून गॅस वाहतूक करणे हे क्रमप्राप्त असले तरी महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीतरी वेगळा पर्याय निवडावा लागेल. गॅस पाईप लाईन हा त्यावरचा प्रभावी उपाय ठरू शकतो. किंवा महामार्गावर अशा टँकर साठी वेगळा ट्रॅक करणे, या टँकरचा चालक हा कुशल असला पाहिजे. ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या चालकाला परवाना देताना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वेगळे निकष लावले पाहिजेत.
देशाने अनेक महामार्ग बनवले आहेत. समृद्धी महामार्गाचे उदाहरण देता येईल.(stopped) पण अशा महामार्गावर असंख्य जीवघेणे अपघात होतात आणि झाले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना केली गेली पाहिजे. महामार्गावर नेमके कुठे आणि कसे अपघात होतात याचा अभ्यास करून काही ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. पण पुढे काय हे समजलेले नाही.ज्वलनशील गॅस असलेला टँकर महामार्गावर कसा काय उलटला याचीही चौकशी झाली पाहिजे. कारण अशा प्रकारचे टँकर म्हणजे जिवंत बॉम्ब असतात. टँकर मधून बाहेर पडलेला गॅस हा हवेत विरघळवण्यासाठी आणि त्याच्यातील ज्वलनाशीलता संपुष्टात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडे तशा प्रकारची यंत्रणा असली पाहिजे. जेणेकरून ही गॅस गळती तासाभरात संपुष्टात आणून वाहतूक सुरळीत करता येऊ शकेल. तथापि तब्बल 15 /20 तास प्रवाशांना वाहनांमध्ये बसून थांबावे लागत असेल तर आपत्कालीन व्यवस्था आपल्याकडे पूर्ण क्षमतेने नाही असे नाइलाजाने म्हणावे लागेल.
हेही वाचा :
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई हादरली; हायड्रोजन फुग्यांचा स्फोट, 3 जण गंभीर भाजले – धक्कादायक VIDEO समोर