हिवाळ्याची चाहूल लागताच थंडीबरोबरच अनेक आरोग्यविषयक समस्या डोके वर काढतात.(winter) विशेषतः या काळात पाठदुखी, मानदुखी आणि खांद्यांमधील वेदना वाढताना दिसतात. बदललेली जीवनशैली, कमी हालचाल आणि थंड हवामान यांचा थेट परिणाम स्नायूंवर होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे हिवाळ्यात स्नायू आणि सांध्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहेथंडीपासून संरक्षणासाठी अनेकजण पाय दुमडून झोपणे, जास्त वेळ एकाच जागी बसून राहणे किंवा व्यायाम टाळणे अशा सवयी अंगीकारतात. मात्र यामुळे पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक रचनेवर ताण येतो. मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिवापर, चुकीची बसण्याची पद्धत यामुळे पाठदुखीची समस्या अधिक तीव्र होते.

ज्येष्ठ ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन यांच्या मते, थंड हवामानात शरीरातील स्नायू आकुंचन पावतात(winter) आणि रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा येतो आणि लवचिकता घटते. हिवाळ्यात अनेकजण घराबाहेर पडणे आणि नियमित व्यायाम टाळतात. या सवयींमुळे पाठ, मान आणि खांद्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. सांधेदुखी आणि श्वसनाच्या त्रासाबरोबरच हिवाळ्यात पाठदुखी ही एक सामान्य समस्या ठरली आहे. विशेष म्हणजे ही समस्या केवळ वृद्धांपुरती मर्यादित न राहता तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींमध्येही आढळते. थंडीमुळे हालचाली मंदावतात आणि त्यामुळे अस्वस्थता अधिक वाढते.
तज्ज्ञ सांगतात की, तापमान घटल्यामुळे पाठीच्या कण्याला (winter)आधार देणारे स्नायू घट्ट होतात. यामुळे स्नायूंवर ताण येण्याची शक्यता अधिक असते. थंडीपासून बचावासाठी अंथरुणात पाय दुमडून बसणे किंवा झोपणे यामुळे स्नायूंवर अतिरिक्त दबाव पडतो. तसेच शारीरिक हालचाली कमी झाल्याने स्नायूंमध्ये कडकपणा वाढतो.अशा स्थितीत वाकणे, जड वस्तू उचलणे किंवा जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे यासारख्या साध्या कृतीदेखील वेदनादायक ठरतात. स्नायूंमध्ये कडकपणा, वेदना, लवचिकता कमी होणे आणि थकवा जाणवणे ही प्रमुख लक्षणे आहेत. वेळेवर काळजी न घेतल्यास स्पॉन्डिलायसिस, मणक्याच्या डिस्कसंबंधित समस्या आणि स्नायूंमध्ये सूज वाढू शकते.

तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात पाठदुखी अत्यंत त्रासदायक ठरू शकते. (winter)थंडीमुळे आधीपासून असलेले स्पॉन्डिलायसिसचे त्रास अधिक बळावतात. त्यामुळे काही सोप्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.हिवाळ्यात संपूर्ण अंग झाकणारे उबदार कपडे घालावेत आणि शरीर उबदार ठेवावे. एकाच स्थितीत जास्त वेळ बसणे टाळावे आणि दर काही वेळाने सौम्य शारीरिक हालचाल करावी. झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंना आराम मिळतो. सकाळी आणि रात्री रूम हीटरचा वापर केल्यास स्नायूंचा कडकपणा कमी होतो. पुरेसे पाणी पिणे, संतुलित आणि पोषक आहार घेणे यामुळे स्नायूंचा थकवा आणि सूज कमी होण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंगने करावी, योग्य आसन व्यवस्था ठेवावी आणि वारंवार बसण्याची स्थिती बदलावी. योग्य काळजी घेतल्यास हिवाळ्यातील पाठदुखी नक्कीच टाळता येऊ शकते
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्याEditEditEdit