अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची (Ajit Pawar) सूत्रे ही अजितदादा यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहेत. राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनही सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचे सर्व अधिकार सोपवले आहेत. अजितदादांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याची, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. अजित पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते या विलीनीकरणास अनुकूल नसल्याचे म्हटले जात असले तरी पवार कुटुंबातील बडे चेहरे एकमेकांना भेडत आहेत. आता नुकतेच अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार, खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार यांची भेट झाली आहे. पार्थ पवार, शरद पवार आणि रोहित पवार यांच्या अशाच एका भेटीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवार यांची देहबोली बरंच काही सांगू जात आहे, असे म्हटले जात असून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भविष्यात काही घडणार का? असे विचारले जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार हे पवार कुटुंबात मार्गदर्शकाच्या भूमिकेत (Ajit Pawar) दिसून येत आहेत. शरद पवार आता तिसऱ्या पिढीला मार्गदर्शन करत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अगोदर पार्थ पवार हे शरद पवार यांना काहीतरी सांगत असल्याचे दिसत आहे. पार्थ पवार यांचे ऐकत असताना शरद पवार हे नकारार्थी मान हलवत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्यांनी डावा हात वर करत नाही असे सांगितले आहे. तरीदेखील पार्थ पवार त्यांचे बोलणे सुरूच ठेवत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे शरद पवार हे नकारार्थी मान हलवत असल्याचे दिसत आहे. पुढे शरद पवार यांनी पार्थ पवार यांना प्रश्न विचारल्याचे आणि पार्थ पवार यांनी त्याला उत्तर दिल्याचेही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पार्थ पवार शरद पवार यांना काहीतरी सांगत आहेत आणि शरद पवार नकार देत असल्याचे दिसत आहे. हाच व्हिडीओ पाहून शरद पवार यांना पार्थ पवार यांच्याविषयी जिव्हाळा असल्याचेही म्हटले जात आहे.
पवार कुटुंबातील (Ajit Pawar) असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये शरद पवार हे पार्थ पवार आणि रोहित पवार यांना मार्गदर्शन करत असल्याचे दिसत आहे. रोहित पवार आणि पार्थ पवार शरद पवारांचे काळजीपूर्वक ऐकत असल्याचे हा फोटो पाहून म्हटले जात आहे. दरम्यान सध्या समोर आलेले हे फोटो आणि व्हिडीओ पाहून शरद पवार हे कुटुंबात मार्गदर्शकाच्या भूमिकेत असून भविष्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार का? असे विचारले जात आहे.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी