तुम्ही बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दुचाकी (two-wheeler) बाजारातील ही ताजी घडामोड तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. कारप्रमाणेच देशात बाईक आणि स्कूटरच्या विक्रीतही लक्षणीय वाढ पाहायला मिळत असून जानेवारी 2026 हा महिना दुचाकी उत्पादकांसाठी अत्यंत यशस्वी ठरला आहे.
दुचाकी सेगमेंटमध्ये हिरो मोटोकॉर्पने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कंपनीने जानेवारी 2026 मध्ये भारतीय बाजारात एकूण 5,20,208 बाईक आणि स्कूटरची विक्री केली. ही विक्री मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 26 टक्क्यांनी जास्त आहे. जानेवारी 2025 मध्ये हिरो मोटोकॉर्पने सुमारे 4.12 लाख दुचाकींची विक्री केली होती.

हिरोच्या पाठोपाठ होंडा बाईक अँड स्कूटर इंडियानेही (two-wheeler) दमदार कामगिरी केली आहे. होंडाने जानेवारी 2026 मध्ये देशांतर्गत बाजारात 5,19,579 दुचाकी विकल्या असून ही विक्री वर्षाकाठी 29 टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये होंडाने सुमारे 4.03 लाख युनिट्सची विक्री नोंदवली होती.
टीव्हीएस मोटर कंपनीसाठीही हा महिना उत्साहवर्धक ठरला आहे. कंपनीने जानेवारी महिन्यात भारतीय बाजारात 3,83,262 बाईक आणि स्कूटर विकल्या. ही विक्री जानेवारी 2025 मधील 2,93,860 युनिट्सच्या तुलनेत सुमारे 30 टक्क्यांनी अधिक आहे.
बजाज ऑटोनेही विक्रीत चांगली वाढ नोंदवली आहे. जानेवारी 2026 मध्ये बजाजने देशांतर्गत बाजारात 2,14,727 बाईक आणि स्कूटर विकल्या, तर मागील महिन्यात कंपनीची विक्री 1,71,299 युनिट्स इतकी होती.
सुझुकी बाईक इंडियाने जानेवारी महिन्यात 1,00,296 दुचाकींची विक्री केली असून वार्षिक आधारावर ही विक्री 14 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2025 मध्ये सुझुकीने 87,834 दुचाकी विकल्या होत्या.

प्रीमियम बाईक सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डची कामगिरीही भक्कम राहिली आहे. (two-wheeler) कंपनीने जानेवारी 2026 मध्ये भारतीय बाजारात 93,871 बाईक विकल्या असून ही विक्री मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 16 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. जानेवारी 2025 मध्ये रॉयल एनफिल्डने 81,052 बाईक विकल्या होत्या.
देशांतर्गत बाजारासोबतच निर्यातीच्या बाबतीतही जानेवारी महिना दुचाकी कंपन्यांसाठी मजबूत ठरला आहे. अव्वल सहा कंपन्यांनी परदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात दुचाकींची विक्री केली. या यादीत बजाज ऑटोने आघाडी घेत तब्बल 1.91 लाख दुचाकींची निर्यात केली. त्यानंतर टीव्हीएसने 1.11 लाख, होंडाने सुमारे 55 हजार, हिरो मोटोकॉर्पने 37 हजार, सुझुकीने 25 हजार तर रॉयल एनफिल्डने 10,541 दुचाकींची निर्यात केली आहे.
एकूणच पाहता, दुचाकी बाजारातील ही वाढ ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास आणि वाहन खरेदीकडे झुकणारी मानसिकता स्पष्टपणे दाखवून देते.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी