कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

आमच्यातील मतभेद व जे काही आहे त्यापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न फार मोठे आहेत (together)या सूचक वक्तव्यापासून सुरू झालेल्याचर्चेला राज ठाकरे यांनीच शिवसेना व मनसेची युती झाली असल्याचे घोषित करून पूर्णविराम दिला. तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे बंधू बुधवारी अधिकृतपणे एकत्र आले पण या एकत्रिकणाचा मुंबईत आज इव्हेंट करण्यात आला. युतीची घोषणा केल्यानंतर ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद अवघ्या पंधरा मिनिटात संपवली. बटेंगे तो कटेंगे च्या धर्तीवर “चुकाल, तुटाल तर संपाल”असा मराठी माणसाला उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला.महेश मांजरेकर यांनी काही महिन्यापूर्वी घेतलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे यांच्याशी हात मिळवणी करणार काय?
तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरापासून ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर मराठी भाषा आणि हिंदी सक्ती या एकाच मुद्द्यावर मोर्चाच्या माध्यमातून ते एकत्र आले होते.

एकत्र मेळावा घेतला होता. आज आम्ही एकत्र आलो आहोत,(together) एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. त्यानंतर काही कौटुंबिक समारंभात ठाकरे बंधू एकत्र आले होते, एकत्र दिसले होते त्यामुळे शिवसेना व मनसे यांच्यातील युतीच्या घोषणेची एक औपचारिकता राहिली होती. तो उपचार बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंनी पार पाडला.उद्धव ठाकरे हे बुधवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले, तेथून ठाकरे बंधू एकाच गाडीतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर गेले. तिथे त्यांनी अभिवादन केले. नंतर ते हॉटेल ब्ल्यू सी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी दाखल झाले.या एकूण कार्यक्रमाला एक प्रकारे इव्हेंटचे स्वरूप आले होते.मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्याचा खास करून उल्लेख केला. या लढ्यात ठाकरे घराणे सहभागी झाले होते. आता आम्ही मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी युतीचा मंगल कलश घेऊन आलो आहोत असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले तर राज ठाकरे यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती झाली असल्याचे घोषित केले.

आमच्यातच जागावाटप किती झाले हे मी सांगणार नाही पण (together)मुंबई महापालिकेचा महापौर मराठी असेल आणि तो आमचाच असेल असे राज ठाकरे यांनी सांगितले.युतीची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही पत्रकार परिषद अवघ्या पंधरा मिनिटात आटोपती घेण्यात आली. पत्रकारांना प्रश्न विचारण्यासाठी ठाकरे बंधूंनी पुरेसा वेळ दिला नाही. आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही जाहीर सभेत जाहीर करू असे ठाकरे बंधूंनी सांगितले. त्यामुळे मुंबईसह आणखी किती महापालिकेत आम्ही एकत्र असणार आहोत, जागा वाटपाचा फार्मूला काय असणार, उमेदवारीचे निकष काय असणार हे सर्व प्रश्नया पत्रकार परिषदेत मांडता आले नाहीत.

मराठी भाषिकांची मुंबई आहे आणि या मुंबईचे दिल्लीश्वराना लचके(together) तोडावयाचे आहेत, पण 105 मराठी माणसांनी मुंबईसाठी बलिदान दिले आहे, तिचे लचके आम्ही तोडू देणार नाही, मराठी माणूस ते करू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यासाठीच त्यांनी मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवलेला आहे.दोन पक्षांच्या युतीची घोषणा करताना दोन्हीकडचे ठाकरे कुटुंबीय एकत्र आले होते. म्हणजेच युती बरोबर कुटुंबीयांचे सुद्धा एकत्रिकरण झालेले आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशालीच्या उजेडात इंजिन धावणार की इंजिन वर मशाल असणार?

हेही वाचा :

नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?

‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्याEditEditEdit