कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
पाकिस्तान मधील आय. एस. आय. संघटनेने बांगलादेशमध्ये चंचू प्रवेश केला असून,(neighboring)भारताविरोधी आपला अजेंडा राबवण्यास सुरुवात केलेली आहे. दिपू चंद्र दास या हिंदू कामगाराची झालेली हत्या हा त्याचाच एक भाग आहे. एकूणच शेजारच्या बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या घटना या भारतासाठी धोकादायक आहेत.बांगलादेशच्या भूतपूर्व पंतप्रधान शेख हसीना यांना तेथील न्यायालयाने देह दंडाची शिक्षा सुनावल्यानंतरत्यांना आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी तेथील कट्टरपंथीयांनी भारतीय दूतावासासमोर उग्र निदर्शने केली. या मागणीसाठी हजारो बांगलादेशी कट्टरपंथीय एकत्र आले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भारतसरकारने नवी दिल्लीतील बांगलादेशच्या राजदूतांना बोलावून घेऊन बांगलादेश मधील बांगलादेशातील भारतीय दूतावासामधील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आणि तेथील व्हिसा सेवाही बंद करून टाकली.

उस्मान हादी हा तेथील विद्यार्थी नेता भारताविरुद्ध गरळ ओकत होता. (neighboring)भारतातील काही राज्ये हा बांगलादेशचा भाग असल्याचा आणि ही राज्ये लवकरच बांगलादेशमध्ये सामील करून घेण्याचीभाषा तो करत होता. त्याची अज्ञाताने हत्या केल्यानंतरबांगलादेशात आगडोंब उसळला आहे. कट्टरपंथीयांनी रस्त्यावर उतरून दंगल सुरू केली आहे. अवामी लीग च्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. येथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंना टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावर हल्ले होऊ लागले आहेत. एकूणच तेथील हिंदू भयभीत झालेला आहे.बांगलादेशमध्ये सध्या जे घडताना दिसत आहे त्यामागे एक भारत विरोधी सूत्र आहे. आणि त्या मागे पाकिस्तान मधील आयएसआय संघटना आहे.बांगलादेशच्या माध्यमातून पाकिस्तानला चार हजार किलोमीटर अंतराची सीमाअस्थिर, अशांत करावयाचीआहे.
बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख डॉक्टर मोहम्मद युनूस यांनाही तेच हवे आहे. (neighboring)बांगलादेशचे राष्ट्रपती असलेल्या शहाबुद्दीन यांना डॉक्टर मोहम्मद युनूस हे विश्वासात घेत नाहीत. त्यांचा अपमान करतात आणि हे तेथील राष्ट्रपतींनीच म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की, बांगलादेश मधील तथाकथित लोकशाही आता जवळपास संपुष्टात आलेली आहे. डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी चीनला बांगलादेशची भूमी काही प्रकल्पांच्या माध्यमातून वापरण्यास दिली आहे. भविष्यात पाकिस्तान, बांगलादेश यांच्याशी भारताचे खटके ऊडू लागले तर हे दोन्ही देश चीनचा भारतावर दबाव आणण्यासाठी वापर करतील.
शेजारच्या बांगलादेशमध्येतेथील अवघी दहा टक्के लोकसंख्या असलेल्या हिंदूंच्यावर रोजच हल्ले होऊ लागले आहेत. हिंदूंची मंदिरे जाळण्यात येऊ लागली आहेत. दिपू चंद्र दास याचा दोष काय, तो म्हणाला कि,परमेश्वराची रूपे अनेक आहेत.
या त्याच्या गुन्ह्याबद्दल या त्याच्या गुन्ह्याबद्दल तेथील कट्टर पंथीयांनी मोबलींचींग करून ठार मारले.(neighboring) झाडाला बांधूनत्याला जिवंत जाळले.बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंदू विरोधी उठावावर भारतातील कोणीही सेक्युलरवादी प्रतिक्रिया व्यक्त करायला तयार नाही. भारतातील याच मंडळींनी काँग्रेससह काही राजकीय पक्षांना सोबत घेऊन नवी दिल्लीत आणि मुंबईत इजराइल पासून पॅलेस्टाईनीजनतेला वाचवावे या मागणीसाठी मोर्चा काढला होता. बांगलादेश मधील हिंदूंना तेथील कट्टरपंथीयांपासून वाचवावे यासाठी ही सेक्युलर वादी मंडळी रस्त्यावर का उतरलेली नाहीत?ऑपरेशन सिंदूर संदर्भात
भारताचा आणि भारतीय लष्कराचा अवमान करणाऱ्यामंडळीना बांगलादेश मधील हिंदूंचा आक्रोश का दिसत नाही? त्यांची नेमकी अडचण काय?

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधी तेथील सरकारने अप्रत्यक्ष भूमिका घेतलेली आहे. (neighboring)कट्टरपंथीयांना सरकारची साथ आहे हे लपून राहिलेले नाही. आणि म्हणूनच भारत सरकारने नवी दिल्लीतील बांगलादेशच्या राजदूतांना बोलावून घेऊन कडक शब्दात समज दिली आहे. एकूणच बांगलादेश मधील अशांत वातावरण भारतासाठी धोक्याचं आहे. आता बांगलादेशमध्ये बसून आयएसआयच्या कारवाया भारताविरोधी सुरू होतील.पण असे धाडस करण्यापूर्वीत्यांनी दहा वेळा विचार करावा. कारण ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्याEdit