कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
संजय मंडलिक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत,(repeating)हसन मुश्रीफ अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि हे दोन्ही पक्ष महायुतीचे घटक आहेत. पण आता मंडलिक विरुद्ध मुश्रीफहा जुनाच संघर्ष नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झाला आहे. संजय मंडलिक यांनी मुश्रीफ यांना मी काही त्यांच्या विचारावर चालत नाही अशा शब्दात फटकारले आणि त्यांना हिटलर ही उपाधी सुद्धा देऊन टाकली.गोकुळच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांचा पराभवहसन मुश्रीफ यांनी घडवून आणला. ही सल सुद्धा त्यांच्या मनात आहे. महायुतीच्या माध्यमातून हे दोन नेते एकत्र होते पण आता नगरपालिकेच्या निवडणूक राजकारणातून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
कागलच्या गटातटाच्या राजकारणातील गंमत म्हणजेघातगे आणि मुश्रीफ हे पुन्हा एकत्र आले आहेत आणि संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ हे एकत्र येऊन पुन्हा बाजूला गेले आहेत.

यालाच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात.कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल मधलं (repeating)राजकारण कायम गिरक्या घेणार ठरल आहे. त्याचाच आधार घेत शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी “कागल विद्यापीठ”असा उल्लेख करून तिथल्या गटातटाच राजकारण चर्चेत ठेवल होत. याच कागल मध्ये आता इतिहासाची पुनरावृत्ती घडताना दिसत आहे. निमित्त झालं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच.कागल आणि मुरगूड या दोन नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. अपेक्षेप्रमाणे हसन मुश्रीफ, संजय मंडलिक यांनी आपापले गड शाबूत ठेवले आहेत. या निवडणुकीत एक राजकीय चमत्कार घडला आणि तो म्हणजे समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ या दोन गटांचे मिलन झाले. निवडणूक निकालानंतरही तिथल्या जनतेला या दोन पारंपारिक राजकीय शत्रूंनी एकमेकाला आलिंगन दिले तेव्हा”याज साठी केला होता का अट्टाहास?”
असा प्रश्न पडला.निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ यांनी, (repeating)आमच्या दोघांची युती सर्वसामान्य जनतेला आवडेल की नाही याची मला शंका होती असे म्हटले आहे.एक काळ असा होता की, समरजीत सिंह घाटगे यांचे पिताश्री विक्रम सिंह घाटगे यांच्या गटात हसन मुश्रीफ एक विश्वासू कार्यकर्ते म्हणून वावरत होते. घाटगे यांचे पानही त्यांच्या शिवाय हालत नव्हते. शाहू सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणातून मुश्रीफ यांनी विक्रम सिंह घाटगे यांची साथ सोडली आणि ते सदाशिवराव मंडलिक यांच्या गटात गेले. तेव्हा मंडलिक विरुद्ध घाटगे यांच्यात टोकाचे राजकारण होते. कागल मध्ये गटातटाचे राजकारण तेथूनच सुरू झाले.विक्रम सिंह घाटगे यांच्यानंतर त्यांचे पुत्र समरजीत सिंह घाटगे यांनी मुश्रीफ विरोधी राजकारण पुढे चालू ठेवले. ते इतके टोकाला गेले होते की, समरजीत सिंह यांच्याकडून मुश्रीफ यांना ईडी कडून केव्हा अटक केली जाते याची प्रतीक्षा केली जात होती.

अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून राजकारणाचे संदर्भ बदलून टाकले.(repeating) आणि त्याचे परिणाम समरजीत सिंह घाटगे यांच्या राजकीय अडचणी वाढण्यात झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर झाले आणि कागल मध्ये राजकीय चमत्कारच घडला. समरजीत सिंह आणि मुश्रीफ हे दोघेही एकत्र आले. आपण का एकत्र आलो आहोत, त्याचे नेमके कारण काय या दोन प्रश्नांची उत्तरे मात्र त्यांनी त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना शेवटपर्यंत दिली नाहीत. तालुक्याच्या विकासासाठीआम्ही एकत्र आलो आहोत हे फसवं वक्तव्य त्यांनी कागलच्या माथी मारलं.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या