कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

चांदी नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी शहरात आणि अहिंसा धर्म(fellow)सांगणाऱ्या भगवान महावीरांचे नाव असलेल्या नगरात एका करंट्या पुत्राकडून जन्मदात्या वृद्ध आई-वडिलांची हत्या झाली.हत्या करण्यासाठी त्यांनी वापरलेली मेथड अंगावर शहारे आणणारी आहे. आई वडील दोघेही घरी नसतात तेव्हा दिवा पेटवूनही अंधाराच भासतो. पण सुनील भोसले या नराधमाने रात्रीच्या दिव्याच्या उजेडात केलेले महाभयानक कृत्य समाजाच्या डोळ्यासमोर अंधारी आणणारे आहे. हा काही पहिलाच प्रकार नाही.बऱ्याच वर्षांपूर्वी करवीर तालुक्यातील वाकरे या गावी असाच पण तिहेरी खूनाचा प्रकार घडला होता.महावीर नगरात साध्या घरात राहणाऱ्या सुनील भोसले यांनी वडील नारायण आणि आई विजय मला यांना ठार मारताना आधी दगडाने ठेचले आणि नंतर विळीवरत्या दोघांच्या हाताच्या नसा कापल्या. घरात रक्ताचा सडा पसरला.

हा कोल्ड ब्लडेड डबल मर्डर म्हणावा लागेल. मानसशास्त्रीय भाषेत त्याला”(fellow)सायको”म्हणता येईल. त्याला राहते घर स्वतःच्या नावावर करून हवे होते.आई आणि वडिलांचे वय पाहता त्या आणखी काही वर्षे जगले असते आणि नंतर हे घर त्यालाच मिळणार होते.पण त्याला घाई झाली होती.आई-वडिलांना हाल हाल करून मारल्यानंतर सुनील पोलीस ठाण्यात गेला. मी माझ्या आई वडिलांची हत्या करून आलेलो आहे असे त्यांनी पोलीस ठाणे अंमलदाराला सांगितले. आणि फिर्यादी तोच आणि आरोपीही तोच बनला.घराच्या आत बाहेर त्यांने हळद वगैरे पसरून आपली मानसिकता काय आहे याचा देखावा त्याने तयार केला होता. ज्या दिवशी त्यांनीही महा भयानक कृत्य केले केव्हा अमावस्या होती. पसरलेली हळद आणि अमावस्या त्यांचा परस्परांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांनी का केला आहे हे आता तपासाचा निष्पन्न होईल. आई आणि वडील म्हणजे मायेचा उत्सव असतो पण सुनील भोसले याने या नात्यांचा चिखल केला आहे.

काही वर्षांपूर्वी शहरातील माकडवाला वसाहतीमध्ये एका (fellow)क्रूर मुलाने आईची हत्या करून तिचे काळीज भाजून खाल्ले होते.त्याला देह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.थोड्याफार फरकाने सुनीलच्या हातून असाच प्रकार घडलेला आहे. कारण त्यांनी आई-वडिलांना नुसते ठार मारलेले नाही तर त्यांना हाल हाल करून मारले आहे.हा प्रकार दुर्मिळातील दुर्मिळ म्हणावा लागेल.काही वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या करवीर तालुक्यातील वाकरे या गावीएका तरुणाने आपले वृद्ध आई-वडील आणि बहीण या तिघांनाही ते झोपेत असताना ठार मारून, हे कृत्य दरोडेखोरांनी केलेलं आहेअसं भासवण्याचा प्रयत्न केला होता.वाकरे गावातील एका शेतकरी कुटुंबाने वंशाला दिवा हवा म्हणून म्हातारपणी गावातील नात्यातील युवकाला दत्तक घेतले होते.

त्याला आई-वडिलांच्या नावे असलेली दहा एकर जमीन स्वतःच्या नावावर करून हवी होती.(fellow) त्यालाही अशीच घाई झाली होती. तालमीत झोपायला जातो म्हणून तो त्या रात्री घराबाहेर पडला आणि मध्यरात्री कौलारू घरावर चढून कौले काढून त्याने घरात प्रवेश केला आणि एकाच ठिकाणी झोपलेल्या आई वडील आणि बहिणीचा क्रूरपणे खून केला. आणि नंतर दरोडेखोरांनी घरातल्यांना ठार मारलं अशी बोंब मारली. पोलीस पाटलांने करवीर पोलीस ठाण्याला वर्दी दिली. पोलीस येणार म्हटल्यावर त्याने”पोलीस काय आता माझे आई बाप आणि माझी बहीण परत आणून देणार आहेत का?”अशी भूमिका घेतली तेव्हा गावकऱ्यांना संशय आला.घटनास्थळी पोलीस आले.त्यांनी त्या दत्तक पुत्राला बाजूला घेतले आणि थोडासा दम देताच त्यांनी आपणच या तिघांना ठार मारले अशी कबली दिली. या तिहेरी हत्याकांडाने तेव्हा संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.नंतर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने ठोठावली. वाकरे या गावी घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाची सुनील भोसले यांच्याकडून झालेल्यादुहेरी हत्याकांडामुळे आठवणजागी झाली.

हेही वाचा :

इचलकरंजी :महाविकास आघाडीला धक्का: सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याचा राहुल आवाडेंसोबत हातमिळवणी

इचलकरंजी : निवडणुका बदलल्या, चेहरे बदलले; पण समस्या तशाच — आश्वासनांच्या जाळ्यात अडकलेली वस्त्रनगरी

बाबा वेंगा : नाही टळणार ही भविष्यवाणी; आता सर्व बदलणार, एक दिवस सर्व जग हिंदू धर्म स्वीकारणार