इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला(joins)जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर आहेत. पक्ष प्रवेशाबाबत त्यांची भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.इचलकरंजी महापालिका निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत चालले आहे. महाविकास आघाडीच्या इच्छुकांच्या मुलाखती आज पूर्ण होत असतानाच एक धक्कादायक राजकीय घडामोड समोर येत आहे. महाविकास आघाडीतील प्रभावी नाव असलेले शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबतची माहिती समजतात आघाडीच्या नेतेमंडळींनी त्यांची समजूत (joins)काढण्याचे प्रयत्न केल्याचे समजते. पण त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा ठाम निश्चय केला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात त्यांचा भाजप प्रवेश निश्चित होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.कांबळे यांनी यापूर्वी नगरपालिका असताना उपनगराध्यक्ष पदावर तसेच अन्य महत्वाच्या समितीच्या सभापती पदावर काम केले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याचीही त्यांनी तयार केली होती. सध्या ते महापालिका निवडणूक लढविण्याची तयारीत आहेत.

यापूर्वीही अनेकवेळा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.(joins)मात्र ते आघाडीतच राहणार असल्याचा दावा नेते मंडळीकडून केला होता. तथापी, गेल्या एक-दोन दिवसात पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अचानक झालेल्या या घडामोडीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीतील एका खाजगी शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीला महिला शिक्षिकेने किरकोळ कारणावरून केली बेदम मारहाण

राजकीय भूकंप! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच बेड्या ठोकणार?

४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ