अनेक गुंतागुंतीनंतर अखेर भाजपच्या चार स्वीकृत नगरसेवक पदासाठीची (approved) नावे आज निश्चित करण्यात आली. यामध्ये आवाडे गटाकडून प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे यांना संधी देण्यात आली आहे, तर हाळवणकर गटाकडून माजी नगरसेवक मारुती पाथरवट व इम्रान बागवान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.यापूर्वीच शिव-शाहू विकास आघाडीकडून संजय कांबळे व इम्रान हावेरी यांची नावे निश्चित झाली आहेत. शुक्रवारी ता. २० दुपारी होणाऱ्या महापालिका सभेत सहा जागांसाठी स्वीकृत नगरसेवकांची नावे अधिकृतपणे घोषित केली जाणार आहेत.

याशिवाय स्थायी, महिला व बालकल्याण आणि परिवहन (approved) अशा तीन समित्यांच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. शिक्षण समिती नव्याने स्थापन केली जाणार असून, त्यांची सदस्य संख्या निवडली जाणार आहे. भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीच्या निमित्ताने मोठा गोंधळ दिसून आला.गेल्या आठ दिवसांपासून दररोज संभाव्य नावे बदलत होती. त्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आवाडे गटाकडून निकटवर्तीय सुनील पाटील यांच्यासाठी जोर धरण्यात आला होता. पण, पक्षीय धोरणानुसार पराभूत उमेदवारांना संधी देण्याबाबतचा वाद निर्माण झाला. त्यामुळे त्यांना संधी देताना हाळवणकर गटात खळबळ उडाली. त्यांच्याकडूनही पराभूत उमेदवाराचे नाव पुढे करण्यात आल्याने गुंता निर्माण झाला.

अखेर या वादामुळे सुरुवातीपासून निश्चित समजले जाणारे (approved)सुनील पाटील यांचे नाव मागे पडले. त्यांच्या जागेवर अविनाश कांबळे यांचे नाव अनपेक्षितपणे पुढे आले आहे, तर प्रकाश दत्तवाडे हे आवाडे यांच्या निकटचे आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपकडून सुरुवातीपासून पाथरवट यांचे नाव निश्चित होते.पण, त्यांच्या नावालाही काहीजणांनी विरोध दर्शविला होता. विरोध डावलून हाळवणकर गटाकडून त्यांना संधी दिली आहे. तर निवडीचा वाद इम्रान बागवान यांच्या पथ्यावर पडला आहे. त्यांच्या नावावर आज एकमत झाले.मोठे बहुमत तरीही गोंधळाची परिस्थिती महापालिकेत भाजपकडे मोठे बहुमत आहे, तरीही स्वीकृतपदासाठी चार नावे निश्चित करताना नेतेमंडळींचा कस लागला. गेली आठ दिवस इचलकरंजी-मुंबई -इचलकरंजी अशा बैठका होऊन निर्णय होण्यास विलंब लागला. पुढील काळात भाजपमध्ये गटातटाच्या राजकरणात वाढ होण्याचे चित्र यातून समोर येत आहे.

हेही वाचा :

अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली, काय झालं?

एपस्टीन फाइल्स प्रकरणात सर्वात मोठी अटक! या दिग्गजावर कारवाई होताच जगात खळबळ