महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत इचलकरंजी (pumping)शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या ६ जलकुंभ व पंपिंग मशिनरी उभारणीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असून, ही कामे अत्यंत संथ व असमाधानकारक गतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे इचलकरंजी उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना सविस्तर निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या ६ जलकुंभ पंपिंग मशिनरी उभारणीच्या कामांची एकूण अंदाजित किंमत ३१ कोटी रुपयांहून अधिक आहे. सदर कामांसाठी गोरुर इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि., नेरुळ, नवी मुंबई या कंपनीस दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी कार्य आदेश देण्यात आला असून, करारानुसार ही कामे १८ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, कार्य आदेश देऊन आजतागायत सुमारे ५ ते ६ महिने उलटून गेले असतानाही प्रत्यक्ष कामाची प्रगती अत्यंत नगण्य असल्याचे निदर्शनास येत आहे.

पी. बा. पाटील मळा ११ लाख लिटर, शांतिनगर १० लाख लिटर, (pumping)जवाहरनगर १४ लाख लिटर, जुना चंदूर रोड ८ लाख लिटर, तोरणानगर १३ लाख लिटर व तुळजाभवानीनगर १२ लाख लिटर या ठिकाणी उभारण्यात येणारे जलकुंभ व पंपिंग मशिनरी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तथापि, काही ठिकाणी काम केवळ १० टक्क्यांपर्यंतच झाले असून, अनेक ठिकाणी अद्याप कामास सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे उर्वरित १२ ते १३ महिन्यांच्या कालावधीत ही सर्व कामे पूर्ण होतील का, याबाबत तीव्र शंका व्यक्त होत आहे.या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे संबंधित कंत्राटदार कंपनीचा मागील कामकाजाचा रेकॉर्ड समाधानकारक नसल्याची माहिती. सन २०२१ मध्ये तत्कालीन कौन्सिलने या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव सादर केला होता, अशी नोंद असतानाही शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प त्याच कंपनीला देण्यात आल्याने नागरिकांमध्ये व लोकप्रतिनिधींमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
इचलकरंजी शहर आधीच पाणीटंचाई, गळती, अपुरा दाब व अनियमित (pumping)पाणीपुरवठा या गंभीर समस्यांना सामोरे जात आहे. जलकुंभ उभारणीचा हा प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास त्याचा थेट फटका शहरातील सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून, परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे ६ जलकुंभ उभारणीच्या कामांची तातडीने प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित कंत्राटदाराकडून प्रत्येक जलकुंभासाठी स्वतंत्र व कालबद्ध कृती आराखडा ॲक्शन प्लॅन सादर करून घेण्याचे, कामात दिरंगाई,निष्काळजीपणा किंवा अकार्यक्षमता आढळल्यास करारातील तरतुदीनुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे मागणी केली आहे.ठरवून दिलेल्या १८ महिन्यांच्या मुदतीत ही सर्व कामे पूर्ण होतील, याची स्पष्ट जबाबदारी निश्चित करावी आणि नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद
इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!
फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?