येथील पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी पुन्हा कमी होत आहे.(blackened)सध्या पात्रातून काळपट रंगाचे पाणी वाहत असून जलपर्णीचा विळखा घट्ट होत आहे.घाट परिसर जलपर्णीने व्यापला असून नदीतील पाणी अधिक गतीने प्रवाहित न झाल्यास जलचरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

घाट परिसरात असलेल्या बंधाऱ्यात लोखंडी बरगे असल्यामुळे पाणी साठा आहे.(blackened) यामध्ये जलपर्णी वाढत चालली आहे. घाट परिसर उथळ असल्यामुळे जलपर्णी अधिक वेगाने वाढताना दिसत आहे. सध्या हा परिसर बऱ्यापैकी जलपर्णीने व्यापला आहे.
यापूर्वीही अनेक वेळा लोकसहभागातून जलपर्णी काढण्यात आली होती.(blackened) पण सध्या त्याबाबत उपाययोजना करताना दिसत नाही. नदी पात्रातील पाण्याला काळपट रंग आला असून उग्र वास येत आहे.सध्या शहराला कृष्णा नदीसोबतच पंचगंगा नदीतूनही पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत वेळीच दक्षता न घेतल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.
हेही वाचा :
अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?
टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली, काय झालं?
एपस्टीन फाइल्स प्रकरणात सर्वात मोठी अटक! या दिग्गजावर कारवाई होताच जगात खळबळ