इचलकरंजी शहरात नशिल्या इंजेक्शनच्या अवैध व्यापाराने गंभीर स्वरूप धारण केले (injections)असून पोलिसांच्या तिसऱ्या मोठ्या कारवाईत हा धोकादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पंचगंगा नदीकाठावरील स्मशानभूमी परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी तात्काळ सापळा रचत कारवाई केली. यावेळी १९ वर्षीय तरुणाकडून प्रतिबंधित मेफेन्टर्मिन सल्फेट या नशिल्या इंजेक्शनच्या मोठ्या साठ्यासह मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ६३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

समर्थ दत्तात्रय चौगुले, रा. विवेकानंदनगर, कोरोची असे अटक करण्यात (injections)आलेल्या तरुणाचे नाव असून तपासादरम्यान त्याच्या ताब्यातील प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या बॉक्समधून तब्बल १०० नशिल्या इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरणे अत्यंत धोकादायक असून मानवी जीवितास गंभीर धोका पोहोचवू शकते, याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपीने हे इंजेक्शन अवैधरीत्या मिळवून विक्रीच्या उद्देशाने साठवले असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात (injections)नशेचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचे भयावह चित्र समोर आले आहे. पोलिसांकडून आरोपीकडे पुरवठा कुठून झाला, हे इंजेक्शन कुणासाठी होते आणि यामागे मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
हेही वाचा :
मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!
प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…