सुट्टीच्या दिवशी हमखास पाहुणे घरात येतात. पाहुणे घरी आल्यानंतर नेमकं (traditional)शाहाकारी पदार्थ बनवावे की मांसाहारी पदार्थ बनवावे? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. अनेकांच्या घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास दिले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले टेस्टी आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावेत. आज आम्ही तुम्हाला गावरान पद्धतीमध्ये काळ मटण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे मटण चवीला अतिशय सुंदर लागते. गरमागरम भाकरी आणि वाफाळत्या भातासोबत काळे मटण सुंदर लागते. तुम्ही बनवलेलं काळं मटण खाऊन पाहुणे सुद्धा खूप खुश होतील. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर इत्यादी ठिकाणी काळे मटण बनवले जाते. मटण मसाल्याच्या प्रमाणामुळे आणि शिजवण्याच्या पद्धतीमुळे मटणची चव अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया काळ मटण बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
मटण
कांदा
लसूण आलं
हिरवी मिरची
कोथिंबीर
काळा (traditional)मसाला
सुक खोबर
खडे मसाले
कृती:
काळ मटण बनवण्यासाठी सर्वप्रथम, मटण स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मटणाला हळद (traditional)आणि मीठ लावून काहीवेळ तसेच ठेवा.
वाटप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये सुकं खोबर आणि कांदा मंद आचेवर काळसर होईपर्यंत भाजून घ्या.
त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घालून सर्व खडे मसाले भाजा. मसाले भाजल्यामुळे मटणाची चव अतिशय सुंदर लागेल.
मटण शिजवण्यासाठी टोपात तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट भाजा आणि चवीनुसार हळद टाकून मिक्स करा.
त्यानंतर त्यात मटण टाकून व्यवस्थित मिक्स करा. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून मटण शिजवून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यात तयार केलेले काळे वाटप मंद आचेवर भाजा. त्यानंतर त्यात काळा मसाला, हळद आणि थोडस लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
मसाला पूर्णपणे शिजल्यानंतर त्यात मटण टाकून मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून मटण शिजवा.
सगळ्यात शेवटी मटणवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले काळे मटण.
हेही वाचा :
महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?
राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?
२४ लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद