ख्रिसमस हा सण घरांपासून ते कामाच्या ठिकाणांपर्यंत मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.(cake)त्यातच ख्रिसमस म्हंटल की प्लम केक हा असलाच पाहिजे. म्हणूनच ख्रिसमस हा सण जवळ येताच लोकं या केकची तयारी करण्यास सुरूवात करतात. ख्रिसमस सणानिमित्त बनवला जाणार केकमध्ये रमचा वापर केला जातो. केकला चांगला टेक्सचर मिळावा यासाठी यात अंड्यांचा वापर देखील केला जातो. ड्रायफ्रुट्स, नट्स आणि मसाल्यांनी बनवलेला प्लम केक हा एक खास ख्रिसमस रिच्युअल आहे. अशातच बरेच लोकं जे फक्त शाकाहारी पदार्थ खाता ते अंड आणि रम असलेला केक खाणं टाळतात. त्यामुळे तुम्ही रम आणि अंड्यांशिवाय एक चविष्ट प्लम केक खायचा असेल तर आजच्या लेखात आपण त्याची सोपी स्टेप-बाय-स्टेप रेसिपी जाणून घेऊयात.प्लम केकमध्ये केवळ एक उत्तम चवच नाही तर काजू आणि मसाल्यांचे मिश्रण पौष्टिकता वाढवते. ख्रिसमस सणानिमित्त बनवलेला केक हा आनंद साजरा करण्याचा एक मार्ग आहे. यावेळी बिना रम आणि अंड्यांचा प्लम केक बनवा जेणेकरून प्रत्येकजण या पारंपारिक ख्रिसमस ट्रीटचा आनंद घेऊ शकेल.

प्लम केक बनवण्यासाठी 50 ग्रॅम टुटी-फ्रुटी
20 ते 25 ग्रॅम सुक्या ब्लूबेरी
50-50 ग्रॅम तीन वेगवेगळ्या प्रकारचे मनुके
1/4 कप साखर आणि तेवढेच गूळ पावडर.
संत्र्याचा रस (सर्व सुके मेवे त्यात भिजवता येतील इतके घ्या)
140 ग्रॅम मैदा.
छोटा अर्धा चमचा मीठ
अर्धा चमचा दालचिनी पावडर
छोटा अर्धा चमचा लवंग पावडर
छोटा अर्धा चमचा जायफळ पावडर,
अर्धा चमचा सुंठ पावडर
अर्धा चमचा बेकिंग पावडर
दोन चिमूटभर बेकिंग सोडा
100 ग्रॅम बटर
140 ग्रॅम फुल क्रीम दूध
5 मिली व्हॅनिला एसेन्स
संत्र्याच्या सालीचा एक चतुर्थांश भाग
अर्ध्या लिंबाची साल लागेल.(cake)ड्रायफ्रूट्स भिजत ठेवा
प्लम केक बनवण्यासाठी सर्व ड्रायफ्रूट्स रममध्ये भिजवले जातात, परंतु तुम्ही रम न वापरता त्याऐवजी संत्र्याचा रस वापरू शकता. संत्र्याचा रस एका काचेच्या बरणीत घ्या आणि त्यात मनुका, ब्लूबेरी, टुटी-फ्रुटी, अक्रोड आणि बदाम असे सर्व ड्रायफ्रुट्स भिजवा. आणि ते किमान दोन दिवस ठेवा. तुम्ही हा वेळ आणखी वाढवू शकता, कारण ते केकला अधिक उत्तम चव देते.
गॅसवर एक तवा ठेवा. त्यात साखर घाला आणि कॅरॅमलाइझ करा. (cake)गॅस कमी ठेवा. साखर सतत ढवळत राहा.साखर वितळून कॅरॅमलसारखी दिसू लागली की, गूळ घाला आणि तो वितळेपर्यंत ढवळत राहा. साखर रंग बदलू लागली की, गॅस बंद करा.आता गूळ आणि साखरेच्या मिश्रणात पाणी टाका आणि स्लरी तयार होईपर्यंत ढवळा. नंतर, गॅस परत चालू करा आणि ते थोडे घट्ट होईपर्यंत शिजवा. थंड झाल्यावर ते लक्षणीयरीत्या घट्ट होते, जे केक बनवण्यासाठी आवश्यक आहे.आता एक मोठा भांड घ्या आणि त्यात काळी मिरी, दालचिनी, लवंग पावडर इत्यादी सर्व मसाल्यांसह पीठ चाळून घ्या आणि बाजूला ठेवा.एक पॅन गरम करा आणि मध्यम आचेवर बटर वितळवा. त्यात संत्र्याचा रस, साखर आणि गुळाचे मिश्रण टाका आणि शिजवा.

उकळी आली की गॅस बंद करा.तयार केलेले संत्र्यांच मिश्रण थंड झाल्यावर (cake)त्यात संत्र्याच्या रसात भिजवलेले ड्रायफ्रुट्स, दूध आणि व्हॅनिला एसेन्स टाका आणि सर्व साहित्य चांगले मिक्स करा.आता हे मिश्रण चाळलेल्या पिठामध्ये टाकून चांगले मिक्स करा. जर पिठाची घनता खूप घट्ट वाटत असेल तर उरलेला संत्र्याचा रसाचा वापर करा.बटर आणि संत्र्याच्या रसाच मिश्रण तयार केलेलं त्यात संत्र्यांच्या सालीचा बारीक किस करून टाका आणि त्याचबरोबर लिंबाचा रस देखील मिक्स करा. आता हे केकच मिश्रण बेकिंगसाठी तयार आहे.एक केक लोफ टिन घ्या, त्यावर बटर पेपर लावा आणि नंतर त्यात केकच तयार मिश्रण ओता आणि हलके टॅप करा जेणेकरून आत तयार झालेली हवा बाहेर निघून जाईल.ड्राय क्रॅनबेरी, बदाम आणि काही टुटी-फ्रुटी केकच्या मिश्रणावर सजवा.प्रीहीटेड ओव्हनमध्ये 150 अंश सेल्सिअसवर 1 तास बेक करा.अशाप्रकारे तुम्हाला अंड्यांचा वापर नसलेला आणि रम नसलेला स्वादिष्ट प्लम केक तयार करता येईल. आता हा केक बेक झाल्यावर थंड करा.तयार प्लम केक तुम्ही ख्रिसमस सणानिमित्त तुमच्या कुटुंबासह आणि पाहुण्यांसोबत शेअर करू शकता.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या