मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. (actress) यामध्ये सर्वात जास्त उमेदवार हे भाजपचे निवडून आले आहेत.पण यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे या निवडणुकीत निवडून आलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांची. या निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला आहे.

मुंबईतील प्रभाग क्रमांक 25 मधून त्यांनी निवडणूक लढवली. (actress) ज्यामध्ये त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार योगेश भोईर यांचा पराभव केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.निवडणुकीच्या आधीच निशा परुळेकर यांनी थेट घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला.

याचाच थेट फायदा त्यांना या निवडणुकीत झाला आणि त्या बहुमतांनी विजयी झाल्या. (actress) आता काही दिवसांमध्ये मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यामध्ये राजकारणात कोणते नवीन समीकरण बघायला मिळतात हे बघावे लागेल.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर