इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज (Week)येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचा सांगता समारंभ व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धेच्या शाखास्तरीय स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक वक्ते श्री. कृष्णात करपे यांच्या उपस्थितीत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समारंभास संस्थेचे आजीव सेवक श्री. भूपाल कुंभार, माजी प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, प्राचार्य डॉ. चंद्राणी बागडी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध गटातील वक्तृत्व, निबंध, चित्रकला, कराओके व सुगम गायन याबरोबरच पाककला, रस्सीखेच स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे श्री. करपे म्हणाले, ” विवेकानंदांचे, बापूजींचे विचार विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात करून वाटचाल करायला हवी. महाविद्यालयात जीवन हे स्वप्नांसाठी झपाटून कष्ट करण्याचे वय आहे याची जाणीव या सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्हायला हवी यासाठी सप्ताह व स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.

अध्यक्षीय मनोगतात बोलताना प्राचार्य डॉ. खाडे म्हणाले की, ” (Week) शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे विचार आणि कार्य यांची उजळणी या विवेकानंद सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गुरुदेव कार्यकर्त्यांनी केली. त्यांचे वैचारिक कार्य हे विद्यार्थी पुढे घेऊन जातील.” असे विचार व्यक्त करत त्यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले. यावेळी मा. श्री भूपाल कुंभार, प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांची मनोगते झाली. सप्ताहाचा शुभारंभ ग्रंथालयाच्या वतीने भव्य ग्रंथ दिंडी व उद्घाटन समारंभाने झाला. सप्ताह काळात विविध स्पर्धा, व्यापार महोत्सव, पारंपारिक वेशभूषा दिन, फ्लॉवर अरेंजमेंट प्रदर्शन, विविध विषयावरील व्याख्याने असे उपक्रम वाङ्मय मंडळ, सांस्कृतिक विभाग, एन एस एस विभाग, विवेक वाहिनी यांच्या वतीने आयोजित केले गेले.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचा वाढदिवस (Week)सप्ताह दरम्यान शिदोरी दिन म्हणून संपन्न झाला. या दिवशी ग्रंथ प्रदर्शन, ज्ञानशिदोरी ग्रंथभेट आणि एनसीसी व क्रीडा विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 51 विद्यार्थी गुरुदेव कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. याच दिवशी एनएसएस विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. संस्थाप्रार्थनेने सुरू झालेल्या समारोप समारंभाचे प्रास्ताविक वांग्मय मंडळ प्रमुख प्रा. रोहित शिंगे यांनी तर सप्ताहातील स्पर्धांचे निकाल वाचन ज्यूनि. विभाग प्रमुख प्रा. शशिकांत कुंभार यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, प्रा. व्ही. पी. पाटील. आय क्यू ए सी प्रमुख डॉ. दीपक कुंभार, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी. के. वाघमारे,अधीक्षक श्री. आर. बी. जोग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रभा पाटील यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. अंजली उबाळे यांनी केले

हेही वाचा :

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!

प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत काळ मटण, नोट करून घ्या रेसिपी