इचलकरंजी शहरात प्रतिबंधित नशेच्या इंजेक्शनची विक्री (business)थांबवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाया जरी चर्चेत आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात नशेचा सुळसुळाट अद्याप थांबलेला नाही, हेच वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. घराघरांत पोहोचलेली इंजेक्शनची नशा आता थेट मोबाईल स्क्रीनवर येऊन ठेपली असून, सोशल मीडियावरील विशेषतः इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून खुलेआम खरेदी-विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.काही महिन्यांपूर्वी घरातून सुरू असलेल्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा धंदा केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित नसून, त्यामागे मोठी साखळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर झालेल्या कारवायांनी परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता या अवैध व्यापाराने डिजिटल माध्यमांचा आधार घेतल्याने तो अधिक वेगवान, सुलभ आणि पोलिसांच्या नजरेपासून दूर राहणारा बनला आहे.

इंस्टाग्रामवरील बनावट प्रोफाइल्स, सांकेतिक शब्द, खास इमोजी, (business)स्टोरीज आणि डायरेक्ट मेसेजद्वारे संपर्क साधून व्यवहार पूर्ण केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एकदा ओळख पटली की ठराविक ठिकाणी इंजेक्शन पोहोचवले जात असून, या प्रक्रियेमुळे अल्पवयीन आणि कॉलेज तरुण मोठ्या प्रमाणात या जाळ्यात अडकत आहेत. मोबाईलवर काही क्लिकमध्ये नशा सहज उपलब्ध होत असल्याने शहरातील सामाजिक वातावरणावर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत.
या नशेच्या साखळीमुळे केवळ व्यसनाधीनता वाढत नाही, तर त्यातून चोरी, (business)मारहाण, गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे आणि आर्थिक लुबाडणूक यांसारख्या गंभीर समस्यांना खतपाणी मिळत आहे. परिणामी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पालक आणि शिक्षक विशेष चिंतेत आहेत. नशेविरोधातील लढा केवळ छापे आणि अटकांपुरता मर्यादित न ठेवता, डिजिटल ट्रॅकिंग, सायबर पथके, वैद्यकीय साठ्याचे काटेकोर ऑडिट आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची एकत्रित अंमलबजावणी झाली, तरच इचलकरंजीला या विळख्यातून बाहेर काढणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!
प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…