जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस(contest)असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून उमेदवारी कुणाला मिळणार यावर चर्चा रंगलेल्या असतानाच, अनेक ठिकाणी घराणेशाही पुन्हा एकदा पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेषतः इचलकरंजी परिसरातील राजकारणात घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.वस्त्रनगरी इचलकरंजीच्या राजकारणात प्रभाव असलेल्या आवाडे घराण्याची चौथी पिढी म्हणून आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे यांनी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ही चर्चा सुरू असतानाच आज अचानक आमदार राहुल आवाडे यांच्या पत्नी मोसमी आवाडे यांनी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांचे लक्ष या घडामोडीकडे वेधले गेले. प्रशासनाकडूनही या अर्जास अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे.

इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय भूमिका(contest) बजावणाऱ्या मोसमी आवाडे यांनी थेट जिल्हा परिषद निवडणुकीत उडी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रेंदाळ मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गट चे उमेदवार शिवाजी मुरलीधर जाधव यांनीही आज अर्ज दाखल केला आहे. अशा परिस्थितीत भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने महायुतीतच संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, याच रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून यापूर्वी (contest)आमदार राहुल आवाडे स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यामुळे या मतदारसंघावर आवाडे घराण्याचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. हा मतदारसंघ हातातून जाऊ नये यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उमेदवारी अर्जाच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापले असून, येत्या काही दिवसांत आणखी अनपेक्षित राजकीय हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश