इचलकरंजी महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये (candidates) अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत काही चर्चेतील आणि प्रभावी चेहऱ्यांचा अनपेक्षित पराभव झाल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. या पराभूत उमेदवारांपैकी काहींना आता स्वीकृत नगरसेवकपदाची आशा लागून राहिली असून, त्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे साकडे घातले जात आहे. शिष्टमंडळांच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्याचे चित्र आहे.मात्र, निवडणुकीपूर्वीच पक्षाने स्पष्ट धोरण जाहीर केले होते की निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवकपद दिले जाणार नाही. या भूमिकेमुळे आता पक्ष नेतृत्वासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे पराभूत उमेदवारांचे पुनर्वसन करण्याचा दबाव वाढत आहे, तर दुसरीकडे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना डावलल्या जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या काही पॅनेलमधील उमेदवारांचा पराभव कसा झाला, (candidates)यावरही पक्षात चर्चा रंगली आहे. पॅनेल मजबूत असतानाही एखाद-दोन उमेदवारांचा पराभव होतो, यामागे अंतर्गत दगाफटका झाला का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. याशिवाय निवडणुकीनंतर परस्परविरोधी पॅनेलमधील विजयी उमेदवारांच्या हालचालींमुळेही संशयाचे वातावरण तयार झाले आहे.सध्या भाजपचे लक्ष महापौर आरक्षण आणि त्यानंतर होणाऱ्या महापौर निवडीकडे केंद्रित आहे. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा विषय पुढे येणार आहे.

या पदासाठी आधीच अनेक इच्छुकांना शब्द दिल्याचे सांगितले जात (candidates)असून, त्यामुळे निर्णय अधिक गुंतागुंतीचा ठरण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेत भाजप उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती. अशा परिस्थितीत पराभूत उमेदवारांना पुन्हा संधी दिल्यास पक्षांतर्गत असंतोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकूणच, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजपमध्ये आगामी काळात अंतर्गत वादळ निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, पक्ष नेतृत्वासाठी हा निर्णय डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकव