कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. थॉमस एडिसनने अनेक शोध लावले त्याचे उपयोग समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी झाले. (.blessing)कोणताही शोध हा मुख्यतः विकासासाठीच असतो. पण काही गुन्हे प्रवृत्तीचे लोक त्याचा विध्वंससाठी उपयोग करतात. हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सध्याच्या 21व्या शतकात माहिती व तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे. आणि त्याचे बरे वाईट परिणामी समोर आलेले आहेत. डिजिटल तंत्राचा वापर सायबर क्रिमिनल कडून केला जातोय. आता त्याच्याही पुढे ए. आय. हे कृत्रिम बुद्धिमत्तेच तंत्रज्ञान आले आहे. आणि त्याचा गैरवापर ही होत असल्याने सत्य काय आणि असत्य काय हे कळून येत नाही.अजित दादा यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर ए.आय. तंत्रज्ञानाचा उपयोग करून काही फेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेतनिधनानंतर अजित दादा हे कार्यकर्त्यांशी बोलताना, त्यांचा अखेरचा निरोप घेतानाचे भाषण याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोशल मीडियावर दाखवले गेले आहे. आणखी काही व्हिडिओ व्हायरल असे केले आहेत की अपघाताबद्दल सर्वांना संशय यावा. अजित दादांना केंद्रस्थानी ठेवून हे फेक व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

काही स्वार्थी व्यक्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी (.blessing)याचीच जागांच्या आवाजात खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने पसरवत आहेत. हे कृत्या अत्यंत गंभीर आणि दंडणीय गुन्हा असून संबंधित व्यक्तींनी अशा ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप चे वितरण त्वरित थांबवावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पण अजितदादा यांच्या संदर्भातील नेमके कोणते व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीचे ठरले आहेत हे त्यांनी काही उदाहरणे देऊन सांगणे आवश्यक आहे. किमान त्यांनी असे काही घडलेले नाही किंवा अजित दादा हे असे बोललेले नाहीत हे पटवून देणे गरजेचे आहे. तथापि अजितदादा यांच्या बद्दल गैरसमज निर्माण होतील असे फेक व्हिडिओ तयार होऊ नयेत याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
डिजिटल क्रांती झाल्यानंतर गेल्या काही वर्षात सायबर क्राईम वाढला आहे. गेल्या दोन वर्षात 86 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे सेंट्रल क्राइम ब्युरो ने आपल्या अहवालात म्हटले आहे. बहुतांशी आर्थिक फसवणूक ही डिजिटल अरेस्ट या माध्यमातून केली गेली आहे.

देशभरात हजारो गुन्हे सायबर क्रिमिनल्स विरोधात विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सायबर क्रिमिनल्स हे अतिशय हुशार आहेत. त्यामुळे असे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजे शंभर रुपये चोरले जातात आणि त्यापैकी एक रुपया वसूल केला जातो. अशा प्रकारचे डिजिटल गुन्हे सुरू होण्यापूर्वी किंवा वाढण्यापूर्वी समाज माध्यमांचा वापर फेक न्यूजने
केला गेला होता आणि आजही तो होताना दिसतो आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे प्रत्यक्षात निधन होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले आहे अशा बातम्या सोशल मीडियात अनेकदा दिल्या गेल्या होत्या आणि या बातम्या वर विश्वास बसावा म्हणून दृश्यांची तोडफोड करून, त्यांचं एडिटिंग करून ते प्रसारित करण्यात आल होत. मिक्सिंग दृश्यांचा वापर काही बातम्यांमध्येही केला जातो आहे.

विशेष म्हणजे ह्या बातम्या प्रिंट मीडियामध्ये येत नाहीत तसेच (.blessing)इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा येत नाहीत. त्यामुळे वाचकांचा गोंधळ उडतो. देशभर लँडलाईन फोनचे जाळे विणले गेल्यानंतर सुरुवातीला त्याचाही गैरवापर केला गेला. त्याला आळा घालण्यासाठी नंतर कॉलर आयडी हा प्रकार‌ आला. त्याला चकवा देण्यासाठी सार्वजनिक टेलिफोन बूथ चा वापर केला गेला. आता हे सर्व इतिहास जमा झाले असले तरी डिजिटल क्रांतीमुळे गुन्ह्यांचे नवनवीन प्रकार पुढे येताना दिसत आहेत. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी संशोधक काम करत असतात. काही सिद्धांत मांडत असतात. कारण कोणताही शोध हा मानव कल्याण हा हेतू ठेवून लावला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता हा त्यातीलच एक प्रकार आहे.
पण दुर्दैवाने सायबर क्रिमिनल्स त्याचा गैरवापर करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली, काय झालं?

एपस्टीन फाइल्स प्रकरणात सर्वात मोठी अटक! या दिग्गजावर कारवाई होताच जगात खळबळ