केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल? शिवसेना-भाजपच्या ‘या’ बड्या मंत्र्यांना मिळणार?

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार आणि फेरबदल येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर या चर्चांना अधिक वेग आला आहे. पंतप्रधानांच्या अलीकडील बैठका आणि दिल्लीतील राजकीय हालचालींमुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उत्सुकता वाढली असून महाराष्ट्रालाही यावेळी मोठे प्रतिनिधित्व मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी फेरबदलात काही नव्या चेहऱ्यांना संधी देत प्रादेशिक आणि राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो. विशेषतः महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (reshuffle) त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांनाही नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा आहे. याशिवाय शिवसेनेच्या कोट्यातून ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्या नावांचाही विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून पार्थ पवार यांनाही दिल्लीच्या राजकारणात मोठी भूमिका देण्यासाठी मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.(reshuffle) दरम्यान, काही विद्यमान केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचाही फेरआढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. चर्चेनुसार शिवसेनेचे प्रतापराव जाधव तसेच भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून फेरबदलात त्यांना वगळले जाऊ शकते, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

राष्ट्रीय स्तरावरही मोठे बदल होण्याची शक्यता महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही मंत्रिमंडळात व्यापक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच बिहारचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात, असेही राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.(reshuffle) याशिवाय ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारलेले आणि सध्या खासदार असलेले अरुण गोविल यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. तर धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांच्यासह काही वरिष्ठ मंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होऊ शकतो. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकज चौधरी यांना संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आम आदमी पक्षातून आलेल्या राघव चड्ढा किंवा अशोक मित्तल यांच्यापैकी एखाद्याला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा असली तरी याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?

श्रद्धा कपूरच्या अडचणी वाढल्या नेमकं काय घडलं?