पनवेल हादरलं अंगणवाडीत जाण्यास नकार दिला म्हणून चिमुरडीला आईने लाथ मारली?

पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अंगणवाडीत जाण्यास नकार दिल्याने एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (shocking) या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी अंगणवाडीत जाण्यास तयार नसल्याने तिच्या आईचा संताप अनावर झाला होता. संतापाच्या भरात या आईने चिमुरडीला लाथाबुक्क्यांनी आणि अमानुषपणे मारहाण केली. (shocking) हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बालहक्क आणि बालसुरक्षेबाबत आता तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली असून, चिमुरडीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. तसेच, संबंधित महिलेची (आईची) देखील चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. लहान मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी समुपदेशन आणि प्रेमाची गरज असताना, (shocking) अशा प्रकारे पोटच्या मुलांवर होणारे अमानुष हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बालहक्क कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. संबंधित आईवर ‘बाल न्याय कायद्यांतर्गत’ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “अंगणवाडी किंवा शाळेत जाण्यास नकार देणाऱ्या लहान मुलांना मारहाण करण्याऐवजी पालकांनी त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, अशा प्रकारची अमानुष मारहाण मुलांच्या मनावर गंभीर आणि कायमस्वरूपी आघात करू शकते,” असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?

श्रद्धा कपूरच्या अडचणी वाढल्या नेमकं काय घडलं?