दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय अल्पसंख्याक विभागाची वृक्ष लागवड व संगोपन योजना बंद महाराष्ट्र सरकारने वृक्ष लागवड योजना केली बंद दुष्काळग्रस्त भागात पंचनामे सुरू

राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. यंदा राज्यात चांगला पाऊस न झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार एकापाठोपाठ एक पाऊल उचलत आहे. (plantation) अशातच फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या योजनेचे शटर बंद केले. अल्पसंख्याक विभागांतर्गत सुरू असलेली वृक्ष लागवड आणि संगोपन योजना बंद करण्यात आली आहे. २०१६ पासून ही योजना सुरू होती.
अल्पसंख्याक विभागाच्या एकूण निधीपैकी अडीच कोटी वृक्ष लागवड आणि संगोपन योजनेसाठी खर्चाची तरतूद करण्यात आली होती. ३ वर्षांचा आढावा घेतल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने शासनादेश देखील जारी केला आहे. सध्या राज्यात सरकारकडून दुष्काळी भागांमध्ये पंचनामे केले जात आहे. सरकारने सुरूवातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. (plantation) त्यानंतर दुष्काळ यादीतून वगळलेल्या तालुक्यांचा देखील समावेश करण्यात आला. दुष्काळी भागातील शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी सरकार पाऊलं उचलत आहे.
शासन निर्णयानुसार, अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ‘वृक्ष लागवड व संगोपन’ ही योजना या आर्थिक वर्षापासून या शासन निर्णयान्वये बंद करण्यात येत आहे. राज्य सरकारने १५ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी आणि धडक कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता. यामध्ये अल्पसंख्याक विकास विभागासह इतर शासकीय विभागांचा समावेश करण्यात आला होता. शासन निर्णयान्वये ‘वृक्ष लागवड व संगोपन’ ही योजना सुरु करण्यात आली होती.
गेल्या ५ आर्थिक वर्षांतील प्रत्यक्ष खर्च २५ कोटींपेक्षा कमी असलेल्या राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेऊन अशा योजना बंद करणे अथवा एकत्रित करणे याविषयी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. (plantation) त्यानुसार, अल्पसंख्याक विकास विभागामार्फत सद्य:स्थितीत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, अल्पसंख्याक घटकांना दिले जाणारे अर्थसहाय्य आणि प्रस्तावित योजनांचा आर्थिक भार, इतर दायित्वे तसेच मागील ५ वर्षांपासून सदर योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा या सर्व बाबी विचारात घेता ही योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती