सर्वजण सुरक्षित जागा पकडायचा प्रयत्न करत होते. सगळ्यांना मोठ्या प्रमाणात भीती वाटत होती. दहशतीखाली वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक अज्ञात, अनोळखी व्यक्ती गणधारी वाटत होती. (feeling) त्यावेळी त्या डब्यात अठरा प्रवासी होते. सोलापूर येथील महिला होत्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

26 नोव्हेंबर 2008 मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील काळरात्र… याचदिवशी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला.पाकिस्तानमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नरिमन हाऊस यांसह अनेक गर्दीच्या ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. आज या भ्याड हल्ल्याला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. हा हल्ला आपल्या डोळ्यांनी पाहिलेले करमाळयातील माजी नगरसेवक फारुक जमादार यांनी Tv 9 मराठीशी बोलताना या दिवशीच्या कठू आठवणी सांगितल्या.
यावेळी बोलताना फारूक जमादार म्हणाले की, “मंत्रालयातील कामा निमित्त माझे मित्र माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ,साबीर तांबोळी मुंबई येथे गेलो होतो. सर्व कामे आटोपून व्हीटी रेल्वे स्टेशन वर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आलो. (feeling) दरम्यान त्यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ हे करमाळ्याला खाजगी वाहनाने गेले . यावेळी फारुक जमादार स्वतः व त्यांचे सहकारी साबीर तांबोळी हे दोघेच सी एस टी रेल्वे स्टेशन वर थांबले .सिध्देश्वर एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन असल्याने गाडी ला वेळ होता,”
“जवळपास तीन तास रेल्वे स्टेशन वर थांबावे लागले. या काळात स्टेशन वर प्रचंड गर्दी होती. सौदी अरेबिया येथे जाणारे हाज यात्रेकरूंना सोडण्यासाठी आलेले प्रवाश्याची संख्याही यावेळी मोठी होती. रात्री ९ :५० मिनिटांनी सिध्देश्वर एक्स्प्रेस पण प्लाॅटफाॅर्म क्रमांक १४ वर गाडी येत आहे असे अनाउन्समेंट झाले नंतर आम्ही प्लाॅटफाॅर्म क्रमांक १४ च्या दिशेने वाटचाल करत असताना साधारण ९:५८ वाजता एके छप्पन स्टेनगन मधुन गोळीबार सुरू झाला. फटाकड्याच्या आवाजासारखा आवाज माळ लावल्यासारखा सतत येत होता, असं फारूक जमादार म्हणाले.
तसेच “आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो ते ठिकाण आम्ही काही क्षणापुर्वीच सोडले होते तर आमच्या शेजारी बसलेले सोलापूरचे प्रवासी, हजला जाणारे व त्यांचे नातेवाईक या गोळीबारामध्ये सापडले. दुर्दैवाने ते यात मुत्युमुखी पडल्याचे कळले. आजही हा प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. ज्यावेळी गोळीबार सुरू झाला, (feeling) त्यावेळी पळत पळत जाऊन रेल्वेच्या डब्यात बसलो. सर्वत्र गोंधळ उडाला होता सगळे लोक सैरावैरा पळत होते. सर्वजण सुरक्षित जागा पकडायचा प्रयत्न करत होते. सगळ्यांना मोठ्या प्रमाणात भीती वाटत होती. दहशतीखाली वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक अज्ञात, अनोळखी व्यक्ती गणधारी वाटत होती. त्यावेळी त्या डब्यात अठरा प्रवासी होते. सोलापूर येथील महिला होत्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :
इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित
कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच
नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट