१ डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या बुकिंगचे नियम बदलणार, ग्राहकांनी आताच करा हे काम नाहीतर

इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस वापरणाऱ्या देशभरातील कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. एलपीजी सिलेंडरसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. १ डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या बुकिंगच्या नियमामध्ये मोठा बदल होणार आहे. डिसेंबर २०२६ मध्ये गॅस सिलिंडर बुक करण्यापूर्वी ग्राहकांनी आधार बायोमेट्रिक ई-केवायसीची स्थिती तपासणे गरजेचे आहे. (gas cylinders) जर तुम्ही ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नसेल तर त्याचा तुमच्या गॅस सबसिडीवर परिणाम होऊ शकतो. नोव्हेंबरमध्ये सरकारने किंवा तेल कंपन्यांनी आधार ई-केवायसी संदर्भात कोणतेही नवीन नियम जाहीर केलेले नाहीत.

ग्राहकांच्या सोयीसाठी आणि स्पष्टतेसाठी एलपीजी सिलिंडर आणि ई-केवायसीशी संबंधित काही महत्त्वाच्या ८ गोष्टी ग्राहकांना माहिती असणे खूप गरजेचे आहे. एलपीजी ग्राहकांना आधार बायोमेट्रिक ई-केवायसी अनिवार्य आहे. (gas cylinders) घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करावे लागेल. हा नियम इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस या तिन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना लागू आहे. ई-केवायसी न केल्यास ग्राहकांना सबसिडी देणे थांबवले जाऊ शकते. जर तुम्ही अद्याप तुमचे आधार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण केली नसेल तर तुमच्या सबसिडीवर परिणाम होऊ शकतो. पात्र ग्राहकांना पडताळणी पूर्ण झाल्यावरच सबसिडी मिळेल.

ज्या ग्राहकांनी बायोमेट्रिक आधार पडताळणी प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे. त्यांना ही प्रक्रिया पुन्हा करण्याची गरज नाही. (gas cylinders) त्यांचे नियमित गॅस बुकिंग आणि पात्र अनुदान सुरू राहील. डिलिव्हरीच्या वेळी सुद्धा ई-केवायसी करता येते. जर ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसेल तर ते सिलिंडर वितरणाच्या वेळी करता येईल. वितरण करणारी व्यक्ती बायोमेट्रिक पडताळणीसाठी मदत करू शकते. ही संपूर्ण प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे देखील पूर्ण करता येईल. ग्राहक त्यांच्या गॅस कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या ई-केवायसी करता येऊ शकते.

घरी बसून इथे करा ई-केवायसी :

  • इंडेनचे ग्राहक इंडियनऑइल वन ॲप वापरू शकतात.
  • भारत गॅसचे ग्राहक ही प्रक्रिया HelloBPCL ॲपद्वारे करू शकतात.
  • एचपी गॅसचे ग्राहक एचपी पे ॲपद्वारे ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
  • या अॅप्सवर फेस ऑथेंटिकेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे.

जर ईकेवायसीची प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे करण्यात काही अडचण आल्यास ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत गॅस एजन्सीमध्ये जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करून घेऊ शकतात. ज्या ग्राहकांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची नाही किंवा अनुदान घेण्यास नकार द्यायचा आहे त्यांच्याकडे विनाअनुदानित सिलिंडर खरेदी करण्याचा पर्याय आहे. त्यांनी अधिकृत तेल कंपन्यांमार्फत आपल्या पसंतीची नोंदणी करणे गरजेचे आहे. उपलब्धतेनुसार त्यांना ५ आणि १० किलोचे सिलिंडरदेखील मिळू शकतात. ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही. ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे गॅस कनेक्शन आपोआप खंडित होत नाही पण त्यामुळे अनुदानित आणि सवलतीच्या दरातील रिफिल मिळण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट