महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर तुमच्या शहरात किती आहे भाव?

पश्चिम आशियातील अमेरिका-इराण तणाव काहीसा निवळल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. 17 जून 2026 रोजी ब्रेंट क्रूडचा भाव 79 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला. (petrol and diesel) त्यामुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळण्याची अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र तेल विपणन कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

राजधानी दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.20 रुपये प्रति लिटरवर कायम आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 111.18 रुपये तर डिझेल 97.83 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. पुण्यात पेट्रोल 112.04 रुपये आणि डिझेल 98.68 रुपये, तर कोल्हापुरात पेट्रोल 112.57 रुपये आणि डिझेल 99.23 रुपये प्रति लिटर आहे. नागपूर, नाशिक, ठाणे आणि अमरावतीसह राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्येही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये CNGच्या दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (petrol and diesel) त्यामुळे CNG वाहनधारकांनाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. मुंबईत CNGचा दर 86 रुपये प्रति किलो असून पुण्यात तो 95.75 ते 96.50 रुपयांच्या दरम्यान आहे. कोल्हापूरमध्ये 96.95 रुपये, नाशिकमध्ये 96.50 रुपये आणि नागपुरात 88.90 रुपये प्रति किलो दराने CNG विक्री होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही देशांतर्गत इंधन दरात कोणतीही कपात न झाल्याने सर्वसामान्य वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. (petrol and diesel) आगामी काही दिवसांत जागतिक बाजारातील घडामोडी आणि केंद्र सरकारची भूमिका यावर पेट्रोल, डिझेल तसेच CNGच्या दरांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?

जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी