राजधानी दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने, कार्यालये आणि रेस्टॉरंट्स आज (गुरुवार) सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नवी दिल्ली ट्रेडर्स असोसिएशन (NDTA) ने प्रशासनाकडून मिळालेल्या निर्देशांनुसार हे परिपत्रक जारी केले असून, सर्व व्यावसायिकांनी त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून राजधानीत सुरू असलेल्या आंदोलनांमुळे काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये (restaurants) यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षा यांनी दिलेल्या सूचनेनंतर व्यापारी संघटनेने सर्व व्यावसायिक आस्थापनांना निर्धारित वेळेपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले.एनडीटीएचे अध्यक्ष अतुल भार्गव यांनी जारी केलेल्या परिपत्रकात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (restaurants) मालमत्तेचे नुकसान, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत प्रतिबंधात्मक नजरकैदेच्या अधिकारांची मुदत 18 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. (restaurants) मात्र, दिल्ली पोलिसांनी या निर्णयाचा सध्याच्या आंदोलनाशी कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा आदेश नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असून काही माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ लावल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.सध्या कनॉट प्लेस परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हेही वाचा :
हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?