तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी?

गेल्या तीन वर्षांपासून एका लहानग्या मुलाची सुरू असलेली कठीण शोधमोहीम अखेर सुखद वळणावर पोहचली आहे. एका मुलाला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांच्या सतर्कता आणि संवेदनशीलतेमुळे तीन वर्षांपासून एका आपल्या आईवडीलांच्या छत्रछायेतून नाहीशा झालेल्या अनाथ मुलाला अखेर त्याच्या पालकांच्या हाती सुखरुपपणे सोपवणे मुंबई पोलिसांना शक्य झाले आहे. (missing) याबाबत मिळालेली माहीती अशी की दोन वेगवेगळी नावांमुळे एका मुलाची फाईल तीन वर्षे तपासाअभावी पेडिंग होती. मात्र,पोलिसांनी या मुलाला अखेर त्याच्या पालकांच्या हाती सुखरुप पोहचवलेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सतर्कता पथकाने 2023 मध्ये अपहरण झालेल्या 8 वर्षीय मुलाला सुखरूप शोधून त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. अंधेरीच्या एका अनाथालयातून एका 8 वर्षांचा मुलगा अचानक गायब झाला होता. ही घटना 22 ऑक्टोबर 2023 ची आहे. अंधेरी पूर्व येथील स्नेह सदन बाल अनाथालयातून 8 वर्षीय अनिस खान नावाचा मुलगा अचानक गायब झाला होता. अनाथालयाच्या कर्मचारी चंचल प्रसाद नायर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर तपासात एक माहिती उघडकीस आली.

तपासात समोर आले की, अनिसला जुहू चौपाटीवर बेवारस फिरताना जुहू पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नातेवाईकांचा त्यांचा पत्ता न मिळाल्याने 21 ऑक्टोबर 2023 रोजी त्याला ‘स्नेह सदन’मध्ये पाठवण्यात आले होते. पण दुसऱ्याच दिवशी तो तिथून बेपत्ता झाला. (missing) दोन वेगवेगळ्या नावांमुळे आणि कोणताही पुरावा नसल्याने हा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान बनला होता. पोलीस उपायुक्त पश्चिम परिमंडळ 10 च्या आदेशानुसार विशेष पथक तयार करण्यात आले. पीएसआय सागर हुजरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने CCTNS, ICJS पोर्टल, मिसिंग पर्सन सर्च सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 चा आधार घेतला. त्याचबरोबर मुंबईतील सर्व बाल अनाथालयांना भेटी देऊन 2023 पासून दाखल झालेल्या 8 ते 13 वयोगटातील मुलांची माहिती गोळा केली.

शेवटी माटुंगा येथील बाल सुधारगृहात अमन शेख या नावाने दाखल असलेल्या मुलाचा फोटो अनिसशी जुळला. मालवणी परिसरातील नातेवाईकांना फोटो दाखवताच त्यांनी त्याला (missing) आपला भाचा म्हणून ओळखले.दोन वेगवेगळ्या नावांमुळे 3 वर्षे फाईलमध्ये अडकले हे प्रकरण एमआयडीसी पोलिसांनी फक्त एका फोटोमुळे आणि अथक मेहनतीने सोडवले.पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे आणि मुलाला कुटुंबाशी पुन्हा भेटवून दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा :

हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?

पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार?

या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार?