शेतकऱ्यांनो कर्जमुक्तीची पहिली यादी प्रसिद्ध, पण चुकीमुळे थेट होणार लाभ रद्द?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे. या पहिल्या टप्प्यात 533 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कर्जमुक्तीचा लाभ खात्यात जमा होणार आहे.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात बुधवारी कर्जमाफीच्या पहिल्या यादीची घोषणा केली. या यादीत एकूण 533 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.(farmers) प्राप्तिकर विभागाकडून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे सध्या मर्यादित यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, पुढील टप्प्यांमध्ये आणखी लाभार्थ्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

या 533 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य सरकारकडून 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हानिहाय पाहिल्यास ठाणे जिल्ह्यातील 182, लातूर मधील 133, पुणे येथील 85, अमरावती मधील 58, सातारा येथील 38, सोलापूर मधील 21 आणि नागपूर येथील 16 शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या पुढील याद्या लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्या ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जाणार असून, (farmers) त्याचबरोबर ग्रामपंचायत तसेच संबंधित बँकांच्या सूचना फलकावरही प्रदर्शित केल्या जातील. यादीत नाव आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी सेवा केंद्र किंवा इतर सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ॲग्रीस्टॅक नोंदणी करणेही बंधनकारक राहणार आहे.

या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल आणि त्यांची थकीत कर्जरक्कम समायोजित केली जाईल. यासाठी सहकार विभागाने निधी वितरणासंदर्भातील शासन निर्णयही जारी केला आहे.ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी आधार कार्ड, आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक, 7/12 उतारा, बँक खात्याचा तपशील आणि पीक कर्जाची माहिती आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी Farmer Registry पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक नोंदवून मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागते. (farmers) त्यानंतर स्वतःची आणि शेतीची माहिती भरून अर्ज सादर करावा लागतो. माहितीची खातरजमा झाल्यानंतर अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करता येतो. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने घरबसल्या करता येते.

हेही वाचा :

हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?

पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार?

या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार?