राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (arrested)यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याच्या 1995 सालच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आता अटक वॉरंटची अंमलबजावणी होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांना रुग्णालयातूनच अटक केली जाणार का, याबाबत राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रकरणाची सविस्तर माहिती मागवली असून, पोलिस यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर आता पोलिसांकडून (arrested)कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. नाशिक पोलिस आयुक्तांनी माणिकराव कोकाटेंची सध्याची वैद्यकीय स्थिती, डॉक्टरांचा अहवाल आणि कायदेशीर बाबींची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे तत्काळ कारवाई करण्यात येईल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता सली तरी कायदेशीर अडथळे नसल्यास अटक टाळता येणार नाही, असेही बोलले जात आहे. त्यामुळे कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे (arrested)यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मात्र, विजय कोकाटे सध्या कुठे आहेत, याची ठोस माहिती पोलिसांकडे नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. 1995 साली शासकीय सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रांची फेरफार केल्याचा आरोप कोकाटे बंधूंवर आहे. या प्रकरणात दोघांनाही दोन वर्षांची कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला असून, जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्यामुळे अटक अटळ मानली जात आहे. आता माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार का आणि विजय कोकाटे पोलिसांच्या हाती लागणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या
महेंद्रसिंह धोनी IPL ला रामराम ठोकणार; ‘या’ दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा
वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार