अनेकांची गावं त्यांच्या राहत्या घरापासून खूप लांबीची असतात.(passengers)अशावेळेस लोक ट्रेनने प्रवास करणं पसंत करतात. कारण हा कमी खर्चिक आणि जलद पर्याय मानला जातो. याच प्रवाशांसाठी मोठी खूशखबर आहे. आता तुम्ही रिजर्वेशन केलेल्या ट्रेन बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला १० तास अगोदरच मिळणार आहे.रेल्वे बोर्डाने पहिल्यांदा ट्रेनचे वेळापत्रक करताना हा बदल केला आहे. सकाळी ५.०० वाजल्या पासून ते दुपारी २.०० पर्यंतच्या वेळेत असणाऱ्या ट्रेनचे रिजर्वेशन चार्ट एक दिवस अगोदर रात्री ८.०० वाजता तयार होईल.

तसेच दुपारी २.०० वाजल्यापासून ते रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि(passengers) रात्री १२ ते पहाटे ५.०० पर्यंत रवाना होण्याऱ्या ट्रेनचे संपूर्ण रिजर्वेशन चार्ट १० तास अगोदरच जाहीर केले जाणार आहे. या पुर्वी रिजर्वेशन चार्ट हा ट्रेन येण्याच्या ४ तासा आधी जाहीर केला जायचा. त्याने शेवटच्या क्षणी प्रवाशांची तारांबळ उडायची. मात्र आता प्रवाशांची चिंता मिटली आहे. तुम्ही १० तास अगोदर तुमच्या ट्रेन ट्रॅकनुसार उभे राहू शकता आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

प्रवाशांना त्यांच्या रिजर्वेशनची संपूर्ण माहिती देण्यासाठी,(passengers) खास करून जे प्रवासी लांबचा प्रवास करणारे असणार आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदाच वेळेआधीच रिजर्वेशन चार्ट तयार करणार आहेत. इंडिया टुडेशी बोलताना रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तसेच ते म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वेचे चार्ट तयार केले जातील. जेणेकरून लांबचे प्रवासी त्यांचे योग्य नियोजन इतर सुविधा करू शकतील.
हेही वाचा :
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ आयडी कार्ड असणं बंधनकारक
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर
JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवातEdit