महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी (grade)आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आता APAR ID असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही आयडी नसल्यास विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा तसेच डिजिटल गुणपत्रिका मिळण्यात अडचणी येऊ शकतात.दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले असून विद्यार्थी सध्या जोरदार अभ्यासात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत बोर्डाचा हा नवा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. बोर्डाकडून यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली असून शाळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या नव्या नियमानुसार, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना(grade) डिजिटल मार्कशीट मिळवण्यासाठी APAR ID अनिवार्य असणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणपत्रिका थेट DigiLocker मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळा किंवा कॉलेजमध्ये कागदी गुणपत्रिकांसाठी धावपळ करावी लागणार नाही. APAR ID मुळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरक्षितपणे संग्रहित राहणार आहेत. यामध्ये दहावी-बारावीच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आणि पुढील शिक्षणाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज आयुष्यभर उपलब्ध राहतील.

बोर्ड अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, APAR ID मुळे विद्यार्थ्यांची पुढील (grade)शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही आयडी उपयुक्त ठरणार आहे.फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आता APAR ID असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग